एका महिलेला सनातन संस्थेने सिद्ध केलेल्या राखीची सात्त्विकता आणि तिच्यातील चैतन्य सहन न होऊन तिने ती राखी बळजोरीने ओढून घेणे
‘मी सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करत असून एका रुग्णालयात परिचारक म्हणून चाकरी करत आहे. या रुग्णालयात माझ्या समवेत काम करणारी एक महिला कर्मचारी पुरोगामी विचारांची असून तिचा अधूनमधून सहकार्यांशी वाद होत असतो. वर्ष २०२० च्या राखी पौर्णिमेच्या दिवशी मी सनातन संस्थेने सिद्ध केलेली राखी बांधून कामावर गेलो होतो. तेव्हा तेथे ४ – ५ महिलांचे शाब्द़िक भांडण चालू होते. मीही तेथे बसलो होतो. त्यातील एक महिला मी राखी बांधलेली पाहून म्हणाली, ‘‘ही राखी मी तुम्हाला बांधू देणार नाही.’’ तेव्हा मी म्हणालो, ‘‘ठीक आहे. मी राखी काढून ठेवतो.’’ तिने माझेे न ऐकता माझ्या हातावरची राखी ओढून काढली. तेव्हा मी म्हणालो, ‘‘मी राखी बांधत नाही. तुम्ही ती मला परत द्या.’’ त्या वेळी ती महिला म्हणाली, ‘‘मी राखी देणार नाही.’’ तिने ती राखी तिच्या ‘पर्स’मध्ये ठेवली; परंतु ती मला दिली नाही.
हा प्रसंग सर्व कर्मचारी पहात होते. सर्वांच्या मनात विचार आला, ‘ही महिला यांची राखी का घेत आहे ?’ याचे कारण केवळ मलाच ठाऊक होते. ते म्हणजे, ‘सनातनच्या राखीमध्ये पुष्कळ चैतन्य आहे. ते चैतन्य या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक महिलेला सहन न झाल्याने ती चिडली होती.’
या प्रसंगावरून ‘सनातन संस्थेने सिद्ध केलेली राखी सात्त्विक असून तिच्यात चैतन्य आहे’, हे लक्षात आले.’
– एक साधक (वय ५७ वर्षे), जळगाव
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |