हा अपघात नव्हे, तर घातपात ! – रामदास कदम, बाळासाहेबांची शिवसेना
आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात
खेड (रत्नागिरी) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला टँकरने धडक देऊन झालेला अपघात हा अपघात नव्हे, तर घातपाताचा प्रयत्न होता, असा संशय बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी व्यक्त केला आहे. येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
योगेशच्या गाडीला १५० फुट फरफटत नेलं, थोडी चूक झाली असती तर गाडी दरीत कोसळली असती, अपघात नसून घातपाताचा संशय : रामदास कदम #RamdasKadam #YogeshKadam pic.twitter.com/LMUlQ7rgaM
— Maharashtra Times (@mataonline) January 7, 2023
आमदार योगेश कदम खेड-मंडणगड विधानसभा मतदारसंघातील कार्यक्रम पूर्ण करून मुंबईला जात होते. ६ जानेवारीच्या रात्री दहाच्या सुमारास कशेडी घाटातून जात असतांना त्यांच्या गाडीमागून आलेल्या टँकरने आमदार कदम यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की, यामध्ये टँकर उलटला असून टँकरचा चालक मात्र पसार झाला आहे. या अपघातात आमदार योगेश कदम सुदैवाने वाचले आहेत. अपघातात कदम यांचे चालक दीपक कदम आणि दोन सुरक्षारक्षक पोलीस किरकोळ घायाळ झाले आहेत.
आमदार योगेश कदमांच्या अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; चालक फरार, घातपाताचा संशय#YogeshKadam #EknathShinde https://t.co/ps3PzXSdnC
— Maharashtra Times (@mataonline) January 7, 2023
या अपघाताविषयी संशय व्यक्त करतांना रामदास कदम म्हणाले की,
१. रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे घटनेच्या सखोल चौकशीची मागणी आपण केली आहे. आमदार योगेश यांच्या गाडीच्या पुढे आणि पाठीमागे पोलिसांचे वाहन असतांनाही टँकरने पोलीस गाडीला ‘ओव्हरटेक’ करून आमदारांच्या गाडीला पाठीमागून ठोकरले कसे ? हा प्रकार संशयास्पद वाटतो.
२. यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी अनिल परब यांच्या माध्यमातून योगेश कदम यांना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु दापोली मतदार संघातील जनता आमदार कदम यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. त्यामुळे त्यांचा प्रयत्न फसला.
३. त्यामुळे हा अपघात म्हणजे त्यांना संपवण्याचा कट तर नाही ना ? असा माझ्या मनामध्ये संशय आहे. त्यामुळे या अपघाताची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
४. या अपघातानंतर टँकरचालकाने लगेच पळ काढला आहे. तो अद्याप पसार असल्याचे समजते, त्यामुळेच हा अपघात नव्हे, तर घातपात वाटत आहे.
काळजी करू नका आम्ही सर्व सुखरूप ! – आमदार योगेश कदमया अपघातानंतर आमदार योगेश कदम यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
‘मी सुखरूप आहे, काळजी करू नका.’ आई जगदंबेच्या कृपेने आम्ही सर्व सुखरूप आहोत, असा संदेश त्यांनी व्हिडिओ प्रसारित करून दिला आहे. ‘पूर्वनियोजित कार्यक्रम ठरल्यानुसार होतील’, अशीही माहिती आमदार योगेश कदम यांनी दिली आहे. |