लोकांचा मिडियावरचा विश्वास उडाला आहे !
‘गेल्या २० वर्षांत देशात सातही दिवस आणि २४ घंटे चालणारे ३७५ ‘न्यूज चॅनल्स’ चालू झाले आहेत. हा एक असा प्राणी आहे की, जो नेहमी भुकेलेला असतो. येथे प्रश्न उद़्भवतो की, त्याला खायला काय दिले जावे ? तसे पहाता यात काही शंका नाही की, यांची संख्या वाढली आहे; पण दुर्दैवाने गुणवत्ता मात्र न्यून झाली आहे.
आता लोकांचा मिडियावरचा विश्वास उडाला आहे. लोक आम्हाला घाबरतात. आम्हाला कोणत्याही प्रकारचा आदर-सन्मान देत नाहीत. आजचा मिडिया केवळ मनोरंजन आणि नाटकीय किंवा उत्तेजक सामग्री लोकांपुढे सादर करण्याचे एक साधन राहिला आहे.’ – एक ज्येष्ठ पत्रकार
(साभार : लोक कल्याण सेतू, जानेवारी २०१३)