विमानात महिलेवर लघुशंका करणार्याला अटक
बेंगळुरू – न्यूयॉर्कहून येणार्या एअर इंडियाच्या विमानात महिलेवर लघुशंका करणारा आरोपी शंकर मिश्रा याला बेंगळुरू पोलिसांनी अटक केली. शंकर मिश्रा वेल्स फॉर्गो कंपनीत उपाध्यक्षपदी कार्यरत होता. या प्रकरणानंतर आस्थापनाने त्याला नोकरीवरून काढून टाकले आहे.
विमानात महिलेवर लघुशंका करणाऱ्याला अटक: बंगळुरूतून पोलिसांनी पकडले, आरोपीचे वडील म्हणाले- माझा मुलगा सुसंस्कृत#shankarmishra #airindia #airindiaflight #flighturinating #bengluru #benglurupolice #flight https://t.co/qPZOKoxIRg
— Divya Marathi (@MarathiDivya) January 7, 2023
पोलिसांनी शंकर मिश्राच्या वडिलांनाही नोटीस पाठवली आहे. आरोपीचे वडील श्याम मिश्रा म्हणाले, ‘‘माझ्या मुलावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत. माझा मुलगा सुसंस्कृत असून तो असे काही करूच शकत नाही.’’ या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.