शिकाऊ आधुनिक वैद्यांकडून कामबंद आंदोलनास प्रारंभ !
यवतमाळ येथे आधुनिक वैद्यांवर होणार्या आक्रमणांचे प्रकरण
यवतमाळ, ६ जानेवारी (वार्ता.) – येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुन्हा आधुनिक वैद्यांवर आक्रमणे होऊ लागल्याने सर्व शिकाऊ आधुनिक वैद्यांनी काम बंद आंदोलन आरंभले आहे. मागील वर्षभरात झालेल्या आक्रमणात एका आधुनिक वैद्याचा मृत्यूही झाला होता.
५ जानेवारीच्या रात्री ८.३० वाजता सॅबेस्टियन पॉल आणि अभिषेक झा या निवासी वैद्यांवर सूरज ठाकूर या रुग्णाने चाकूने प्राणघातक आक्रमण केले. या वेळी सुरक्षारक्षकही आले नाहीत. त्यामुळे शिकाऊ आधुनिक वैद्यांनी घोषणाबाजी करत मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन चालू ठेवू’, असा निर्धार केला. (वारंवार होणार्या आक्रमणाच्या घटनांवर ठोस उपाययोजना न काढणारे प्रशासन काय कामाचे ? – संपादक)