रात्रीचे जागरण टाळून सकाळी लवकर उठण्याची सवय लावावी !
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १२९
‘काही साधक नामजप किंवा स्वभावदोष निर्मूलन सारणी लिहिणे यांसाठी रात्री जागरण करतात. तसे करण्यापेक्षा रात्री लवकर झोपावे. तेवढा वेळ सकाळी लवकर उठून व्यष्टी साधना करावी.
काही सेवा एकमेकांवर अवलंबून असल्याने काहींना रात्रीचे जागरण करावेच लागते. अशा वेळी शक्य असल्यास सर्वांनी एकत्रितपणे ‘रात्री जागण्यापेक्षा तीच सेवा सकाळी लवकर उठून करता येऊ शकते का ?’, याविषयी सकारात्मक चिंतन करून निर्णय घ्यावा.
एकाएकी झोपेच्या वेळांमध्ये पालट केल्याने काही वेळा ‘झोप पूर्ण झाली नाही’, असे होऊ शकते. त्यामुळे एकाएकी पालट न करता झोपेची वेळ टप्प्याटप्प्याने अलीकडे आणावी.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.१.२०२३)