इराकमध्ये दुचाकी शर्यत पहाण्यासाठी आलेल्या १७ वर्षांच्या मुलीवर मुसलमान पुरुषांकडून आक्रमण !
‘अभद्र’ पोशाख परिधान केल्याचा आरोप !
काबुल (इराक) – इराकमधील कुर्दिस्तान प्रदेशातील सुलेमानी शहरात दुचाकी शर्यत पहाण्यासाठी आलेल्या १७ वर्षांच्या मुलीवर ७ ते ८ मुसलमान पुरुषांनी आक्रमण केल्याचे वृत आहे. ‘तरुण मुलीमुळे आमचे लक्ष विचलित होते’, असा आरोप करत त्यांनी हे आक्रमण केले. याविषयीचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे.
एका वृत्तानुसार, एल्. तारानी म्हणून ओळखल्या जाणार्या १७ वर्षीय मुलीवर पुरुषांच्या मोठ्या गटाने ‘अभद्र’ पोशाख परिधान केल्याचा आरोप करत आक्रमण केले. या स्पर्धेसाठी उपस्थित असलेल्या पुरुषांनी या कार्यक्रमात महिलांना उपस्थित रहाण्यास विरोध केला होता. मुलगी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी ठरली; मात्र तिला पळून जाण्यास साहाय्य करणार्या एका व्यक्तीला चाकूने भोसकण्यात आले.
सौजन्य : जनहित टाइम्स