येशूचे रक्त म्हणून द्राक्षाचे पाणी देऊन धर्मांतराचा प्रयत्न करणार्या तिघांविरुद्ध गुन्हा नोंद !
आळंदी (पुणे) येथील प्रकार !
आळंदी (पुणे) – एका व्हिडिओमध्ये आरोपी सुधाकर सूर्यवंशी त्याच्या दोन साथीदारांसह काही स्थानिकांना ‘ख्रिस्ती धर्माच्या प्रार्थनेने तुमचे आजार बरे करतो, तुम्ही येशूची पूजा करा. यातून तुमच्या आर्थिक आणि आरोग्याच्या समस्या दूर होतील. हिंदु धर्म सोडून तुम्ही ख्रिस्ती धर्म स्वीकारा’, असा आग्रह करत असल्याचे दिसून आले.
Pune Crime News : धक्कादायक! येशूची पूजा करा म्हणत आळंदीत धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्नhttps://t.co/gEAvoUGaQp#pune
— ABP माझा (@abpmajhatv) January 6, 2023
या व्हिडिओतील महिलेच्या हातामधील ताटात लाल रंगाचे पाणी असलेले ग्लास दिसत होते. पोलिसांच्या माहितीनुसार, हे लाल पाणी म्हणजे द्राक्षाचे पाणी असून ते येशू ख्रिस्ताचे रक्त म्हणून दिले जाते. यासंदर्भात नागनाथ कांबळे यांनी तक्रार प्रविष्ट झाल्यानंतर पोलिसांनी धर्मांतराच्या आरोपाखाली सुधाकर बाबूराव सूर्यवंशी याच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार आळंदी येथील साठेनगर परिसरात घडला.
संपादकीय भूमिकाहिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देण्यासह सरकारने कठोर धर्मांतरबंदी कायदाही करावा ! |