निपाणी (कर्नाटक) येथे प.पू. सिद्धेश्वर स्वामी यांना श्रद्धांजली !
निपाणी – कर्नाटक येथील जनयोगाश्रमाचे प.पू. सिद्धेश्वर स्वामी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना निपाणीकरांच्या वतीने महादेव मंदिर येथे श्रद्धांजली वहाण्यात आली. या प्रसंगी महादेव मंदिराचे अध्यक्ष श्री. सुनील पाटील, निपाणी नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्री. जयवंत भाटले, सभापती श्री. राजू गुंदेशा, श्री. चंद्रकांत कोठीवाले, श्री. सचिन कोळकी, श्री. मल्लिकार्जुन गडकरी, नगरसेविका सौ. गीता सुनील पाटील यांसह सनातन संस्थेचे साधकही उपस्थित होते.