प्रत्येक प्रसंगात स्थिर रहाणार्या आणि गुरुदेवांप्रती दृढ श्रद्धा असलेल्या बार्शी, सोलापूर येथील सौ. राजश्री आगावणे !
‘बार्शी सोलापूर येथील सौ. राजश्री आगावणे यांची त्यांचे नातेवाईक आणि साधक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. सौ. अंबिका बळी, (सौ. राजश्रीताईंची मामेबहीण) बार्शी, सोलापूर.
अ. ‘सौ. राजश्रीताई नेहमी आनंदी असते. मला तिच्याशी बोलतांना नेहमी आनंद जाणवतो.
आ. ती इतरांच्या मनातील ओळखून बोलते. त्यामुळे मला ‘तिच्याशी मनमोकळेपणाने बोलावे आणि सतत तिच्या सहवासात रहावे’, असे वाटते. ती मला आईप्रमाणे वाटते.
इ. ती प्रत्येक प्रसंगाकडे साक्षीभावाने पहाते. ती लहान मुलांसारखी निर्मळ आहे.
२. सौ. अनुजा चंद्रकांत तपीसे, पुणे
२ अ. शिकण्याची वृत्ती : ‘राजश्रीवहिनी त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या व्यक्तींकडूनही सतत शिकत असतात. त्यात त्यांना कसलाच संकोच किंवा न्यूनता वाटत नाही.
२ आ. प्रेमभाव
१. त्या सर्वांशी प्रेमाने बोलतात. त्या लहान मुलांशी त्यांच्या वयाच्या होऊन बोलतात.
२. काही कारणांनी साधक नकारात्मक विचारांत अडकले असतील, तर वहिनी त्यांना योग्य दृष्टीकोन देऊन त्या विचारांतून बाहेर पडायला साहाय्य करतात. त्या समोरच्या व्यक्तींना त्यांचे स्वभावदोष आणि चुका प्रेमाने समजावून साधनेत साहाय्य करतात.
२ इ. शांत आणि स्थिर : त्यांच्याकडे पाहिल्यावर ‘त्या शांत आणि स्थिर आहेत’, असे वाटते. त्या दुःखात आणि आनंदात स्थिर असतात.
२ ई. सेवेची तळमळ : त्यांचे बोलणे आणि कृती यांतून त्यांची साधनेची तळमळ दिसून येते. ‘परिस्थितीवर मात करून अखंड सेवा करायची आहे’, हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळते. अनेक अडचणी येऊनही त्यावर मात करत त्यांची सेवा चालूच असते. त्या ‘स्वतःच्या समवेत इतरांचीही सेवा व्हावी’, असा प्रयत्न करतात.
२ उ. गुरुदेवांप्रती दृढ श्रद्धा : प्रथमपासूनच नातेवाइकांचा त्यांच्या साधनेला विरोध होता, तरीही राजश्रीवहिनी अनेक दायित्वे योग्य प्रकारे पूर्ण करून समष्टी सेवा करत आहेत. केवळ परात्पर गुरुदेवांप्रती असलेल्या दृढ श्रद्धेमुळेच त्यांना हे शक्य होत आहे. त्यांच्या बोलण्यातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञताभाव दिसून येतो.
३. सौ. तनुजा पांबरे, पुणे
३ अ. चिकाटी : ‘राजश्रीवहिनींमध्ये एखादी गोष्ट साध्य करण्याची पुष्कळ चिकाटी आहे. विशाखा (सौ. राजश्री यांची विकलांग मुलगी, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) लहान असतांना तिला चिकित्सालयात न्यावे लागायचेे. तेव्हा त्यांना पुष्कळ शारीरिक त्रास व्हायचा; पण त्याला न जुमानता त्या तिला सोलापूरला घेऊन जायच्या. त्यांना सेवेत कितीही अडचणी आल्या, तरीही त्या सेवा पूर्ण करतात.
३ आ. समष्टी सेवेचा ध्यास : वर्ष २००७ मध्ये मी राजश्रीवहिनींना जवळून पाहिले. तेव्हा मला त्यांची ईश्वराप्रती पुष्कळ ओढ आणि सेवेची तळमळ दिसून आली. त्यांना काही वैयक्तिक अडचणींमुळे सेवेला बाहेर जायला जमत नसे; परंतु त्यांना समष्टी सेवा करण्याचा ध्यास असायचा आणि देव वेळोवेळी त्यांना साहाय्यही करायचा.
३ इ. ईश्वराप्रती दृढ श्रद्धा : एखाद्या व्यक्तीला ‘साधना करायला पाहिजे’, हे सांगतांना त्यांची ईश्वराप्रती दृढ श्रद्धा असल्याचे जाणवते. त्यामुळे समोरील व्यक्ती साधना करायला प्रवृत्त होते. मी साधनेपासून दूर गेल्यावर त्यांनीच मला साधना करायला प्रवृत्त केले. त्या मला पहाटे नामजप करण्यासाठी भ्रमणभाष करून ‘उठलीस का गं बाळा’, असे म्हणून प्रेमाने उठवत असत. त्या दिवशी माझा नामजपही चांगला व्हायचा.’
४. सौ. अस्मिता कदम, बार्शी, सोलापूर.
४ अ. अडचणीवर योग्य उपाययोजना सांगणे : माझी लहान मुलगी मोक्षदा (वय ४ वर्षे) जन्मापासून पुष्कळ रडत असे. त्यामुळे माझी पुष्कळ चिडचिड होत असे. तेव्हा राजश्रीताईंनी प्रसंगाचा अभ्यास करून ‘कसा दृष्टीकोन ठेवायचा ?’, हे मला समजावून सांगितले. मी त्याप्रमाणे केल्यावर मोक्षदा एका मासातच पुष्कळ शांत झाली आणि मला तिच्यातील गुण दिसू लागले.
४ आ. विकलांग मुलीची सेवा आनंदाने करणे : त्यांची मुलगी विशाखा विकलांग असून ताई २२ वर्षांपासून तिची सेवा आनंदाने करतात. त्यांनी कधीच त्याविषयी गार्हाणे केले नाही किंवा चिडचिड केली नाही. त्यांना विशाखाची सेवा करत असतांना अनेक शारीरिक त्रास होत असले, तरी त्यांनी मुलीची कधीच हेळसांड होऊ दिली नाही.
४ इ. दोन्ही मुलींवर साधनेचे संस्कार करणे : त्यांच्या दोन्ही मुली साधना करतात. मोठी मुलगी कु. मयुरी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करते. त्यांनी तिला मायेत न अडकवता साधना करायला प्रोत्साहन दिले, तसेच त्यांनी विशाखावरही साधनेचे संस्कार केले.
४ ई. आध्यात्मिक मैत्रीण : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी एका सत्संगात सांगितल्याप्रमाणे मी ६ वर्षांपूर्वी राजश्रीताईंना आध्यात्मिक मैत्रीण म्हणून निवडले. गुरुमाऊलींच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने आमचे नाते हळूहळू दृढ होत गेले. आता आम्हा दोघींमध्ये कमालीची एकरूपता आली आहे. आमच्या दोघींची मने चांगल्या प्रकारे जुळली आहेत.
श्रीकृष्णाने सुचवलेला सौ. राजश्री आगावणे यांच्या नावाचा अर्थरा – राजमार्ग निवडूनी साधनेचा ज – जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून सुटण्याचा श्री – श्रीकृष्णाची सर्वतोपरी झालीस तू आ – आठवण तुला नेहमी श्री गुरूंची गा – गाऊनी सदैव श्रीगुरु गाथा व – वदते सदैव तुझ्या मुखातूनी श्री सरस्वतीमाता णे – नेणे सर्वांसी वैकुंठ लोकी, हेच तुझे ध्येय – सौ. सीमा व्हनकळस (भाची, राजश्रीताईंच्या बहिणीची मुलगी), बार्शी, सोलापूर. |