धार्मिक भावना दुखावणार्यांना चोपणार्यांप्रमाणे इतर स्वामी आणि देवता यांच्या भक्तांनी कृती केल्यास आश्चर्य वाटणार नाही !
‘अय्यप्पा स्वामींविषयी अश्लाघ्य वक्तव्ये करणार्या ‘भारत नास्तिक संघा’चे अध्यक्ष बैरी नरेश यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करत अय्यप्पा स्वामींच्या भक्तांनी तेलंगाणा राज्यात ठिकठिकाणी निदर्शने केली. बैरी नरेश यांनी कोडंगल येथे आयोजित केलेल्या एका सार्वजनिक मेळाव्यात अय्यप्पा स्वामींच्या विरोधात अश्लाघ्य आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी विधाने केली होती. त्यांनी नेमकी काय विधाने केली, ते समजू शकलेले नाही. भाग्यनगर येथे अय्यप्पा स्वामींच्या भक्तांनी बैरी नरेश यांना चोपले. त्या वेळी पोलिसांनी त्यांची सुटका केली.’ (१.१.२०२३)