महापुरुषांवर बोलण्याचा अधिकार कुणालाही नाही ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सातारा, ५ जानेवारी (वार्ता.) – राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी जे वक्तव्य केले, ते त्यांच्याकडून अपेक्षित नव्हते. महापुरुषांवर बोलण्याचा अधिकार कुणालाही नाही, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी ते बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, ‘‘महापुरुषांचा अवमान जनता सहन करणार नाही. प्रत्येकानेच आपण काय बोलतो ?, कसे वागतो ? याविषयी आत्मपरीक्षण केले पाहिजे. नायगाव येथील सावित्रीबाई फुले यांचा वाडा हा ऐतिहासिक ठेवा आहे. राज्यशासनाच्या माध्यमातून तो जतन केला जाईल. फुले दांपत्याचा त्याग हा प्रेरणादायी आहे.’’