जळगाव येथे ७ जानेवारीला भव्य हिंदु जनसंघर्ष मोर्चा !
हिंदु जनजागृती समितीची पत्रकार परिषदेत माहिती
जळगाव, ५ जानेवारी (वार्ता.) – हिंदु महिलांचे जीवन उद़्ध्वस्त करणारा ‘लव्ह जिहाद’ आणि बळजोरीने, तसेच फसवून होणारे हिंदूंचे धर्मांतर करणे यांविरोधात कठोर कायदे केले जावेत, जिल्ह्यातील अवैध पशूवधगृहे, गोतस्करी यांवर पायबंद घालण्यात यावा आणि गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोर कार्यवाही करण्यात यावी, जैन बांधवांचे पवित्र तीर्थक्षेत्र श्री सम्मेद शिखरजी याला पर्यटनस्थळ घोषित करण्याच्या हिंदुद्रोही निर्णयाला विरोध करून त्याचे पावित्र्यरक्षण झालेच पाहिजे, या मागण्यांसाठी जळगाव येथे ७ जानेवारी या दिवशी भव्य ‘हिंदु जनसंघर्ष मोर्च्या’चे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्च्याची माहिती श्री रामदेवबाबा मंदिर, पांडे चौक येथे ५ जानेवारी या दिवशी आयोजित पत्रकार परिषदेत हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला सकल जैन संघाचे श्री. दिलीप गांधी, जळगाव जिल्हा माहेश्वरी सभेचे सचिव श्री. मानकचंद झंवर, सनातन संस्थेचे सद़्गुरु नंदकुमार जाधव, वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर, योग वेदांत सेवा समितीचे जिल्हा कार्यकारी सदस्य श्री. अनिल चौधरी, हिंदु राष्ट्र सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री. मोहन तिवारी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. कपिल ठाकूर यांची उपस्थिती होती.
मोर्च्याचा मार्ग !(प्रारंभ) शिवतीर्थ (जी.एस्. ग्राऊंड) – स्वा. सावरकर चौक – जिल्हाधिकारी कार्यालय (समाप्त) वेळ : सकाळी ११ ते दुपारी १ संपर्क : ९५५२४२६४३९ |