तिळाचे औषधी उपयोग
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १२८
‘रात्री झोपतांना १ चहाचा चमचा तीळ (काळे किंवा पांढरे) २ – ३ मिनिटे चावून खाल्ल्यास शरिराला कॅल्शियम मिळते, दात आणि केस बळकट होतात, सर्व सांध्यांना वंगण मिळाल्याने संधीवात, गुडघेदुखी इत्यादींमध्ये लाभ होतो, तसेच दुसर्या दिवशी सकाळी शौचालाही साफ होते. अधिक लाभासाठी तीळ खाल्ल्यावर साधारण अर्धी वाटी कोमट पाणी प्यावे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.१.२०२३)