सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात येऊन गेल्यानंतर अधिवक्ता चारुदत्त जोशी यांना सुचलेली कविता
तरी म्हणवितो साधक स्वतःला, ही खंत वाटे मनाला ।
श्री गुरूंची आहे अगम्य कृपा, न कळे ती मज पामराला ।
तरी म्हणवितो साधक स्वतःला, ही खंत वाटे आज मनाला ॥ १ ॥
कठोर आणि अप्रिय वाणी माझी दाखवली आजवर जगाला ।
कुणासही समजून घेतले नाही, ही खंत वाटे आज मनाला ॥ २ ॥
करितो प्रयत्न नाना प्रकारे, अखंड मार्गदर्शन श्री गुरूंचे मिळे ।
तरी जाणत नाही स्वभावदोष अन् अहं यांना, ही खंत मनाला वाटे ॥ ३ ॥
भेटती पदोपदी साधक अनेक, त्या योगे गुरुवचनांचा लाभ मिळाला ।
परंतु नाहीच माझ्यात अंकुर प्रीतीचा, ही खंत वाटे आज मनाला ॥ ४ ॥
सेवा वा साधना नसे परिपूर्ण, तरी गुरु सांभाळती मज अज्ञान्याला ।
नाही कुवत उत्तम शिष्याची, ही खंत वाटे आज मनाला ॥ ५ ॥
न कळे स्वभावदोष, न कळे भावजागृती, न कळे श्री गुरूंची प्रीती ।
तरीही करितो श्री गुरुचरणी प्रार्थना, अखंड कृतज्ञता राहो मनी ॥ ६ ॥
– अधिवक्ता चारुदत्त जोशी, संभाजीनगर, महाराष्ट्र. (७.४.२०२०) (मृत्यूपूर्वी केलेली कविता, मृत्यूदिनांक २८.४.२०२१) (मृत्यूसमयी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |