नांदेड येथे जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी महादेव कोळी समाजाकडून हिंदु देवतांचा त्याग !
|
नांदेड – हिंदु देवतांच्या मूर्तीची पूजा करता; म्हणून तुम्ही महादेव कोळी नाही, असे सांगत जात पडताळणी समितीने महादेव कोळी समाजातील एका तरुणीला जातीचे वैधता प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या महादेव कोळी समाजातील लोकांनी तहसीलदार कार्यालयावर ५ जानेवारी या दिवशी निषेध मोर्चा काढला. हा समाज संतप्त होऊन मोठ्या संख्येने रस्त्यावर जमला होता; मात्र शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता असल्याने मोर्च्याला ऐनवेळी अनुमती नाकारण्यात आली. आंदोलकांनी तेथेच ठिय्या आंदोलन चालू केले. यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
या वेळी प्रशासनासमोर शेकडोंच्या संख्येने आलेल्या महादेव कोळी समाजाने देवतांच्या प्रतिमांचा त्याग केला. त्यानंतर शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार किरण अंबेकर यांनी आंदोलनस्थळी येत देवतांच्या प्रतिमा स्वीकारल्या.
सौजन्य : TV9 Marathi
काय आहे प्रकरण ?
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील खरटवाडी गावातील तरुणी मयुरी पुंजरवाड हिने ‘एम्.बी.बी.एस्.’चे शिक्षण घेतले आहे. मयुरी सध्या ‘एम्.डी.’चे शिक्षण घेत आहे. तिच्या वडिलांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले आहे; मात्र मयुरी हिला महादेव कोळी जातीचे वैधता प्रमाणपत्र देण्यास जात पडताळणी समितीने नकार दिला आहे. ‘तुम्ही हिंदु देवतांचे पूजन करता; म्हणून महादेव कोळी नाही’, असा अजब निष्कर्ष काढण्यात आला आहे. ‘असे असेल, तर आम्ही देवांचा त्याग करतो’, अशी भूमिका या समाजाने घेतली आहे. घरातील देवांच्या मूर्ती आणि प्रतिमा प्रशासनाच्या हवाली करण्यात येणार आहे. यापुढे आम्ही हिंदु धर्माच्या कोणत्याच चालीरिती पाळणार नाही’, असे मयुरी हिच्या वडिलांसह महादेव कोळी समाजाने घोषित केले आहे.
संपादकीय भूमिका
|