बीड जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठाच्या घरावर शिरच्छेदाची धमकी देणारा कागद चिकटवला !
बीड – परळी तालुक्यातील सिरसाळा गावात उमेश रंगनाथ पवार यांच्या घरावर ‘आर्.एस्.एस्.के गुंडे तू सिरसालेमे आर्.एस्.एस्. चलाता है… तुझे पता नही है क्या ? इस्लाम से गुस्ताखी की एक ही सजा, सर तन से जुदा, सर तन से जुदा, बहुत जल्दी तेरा सर तन से जुदा किया जायेगा, तू आर्.एस्.एस्. का लीडर है ना रे, तकदीर अल्लाहू अकबर’, असे लिखाण असलेला धमकीचा कागद चिकटवण्यात आला आहे. सिरसाळा पोलिसांनी घटनास्थळाची पहाणी केली. त्यानंतर पोलिसांनी सिरसाळा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद केला असून या प्रकरणाचे पुढील अन्वेषण सिरसाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्ही.एस्. जोनवाल हे करत आहेत.
संपादकीय भूमिका
|