तमिळनाडूमध्ये ख्रिस्ती धर्मप्रचारकाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार !
चेन्नई – राज्यातील एका शहरात एका १५ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तमिळनाडू पोलिसांनी अॅड्यू नावाच्या ख्रिस्ती धर्मप्रचारकाला अटक केली आहे. हा ख्रिस्ती धर्मप्रचारक मुलींसाठी वसतीगृह चालवतो. सदर मुलगी नाताळच्या सुट्टीनंतर पुन्हा वसतीगृहात जाण्यास टाळाटाळ करू लागली. त्या वेळी तिच्या पालकांना संशय आल्यामुळे त्यांनी तिच्याशी चर्चा केल्यावर हे प्रकरण उघड झाले. या प्रकरणी पाद्य्राला पॉक्सो काद्याच्या अंतर्गत अटक करण्यात आली आहे.
Read full report on:https://t.co/alwMFignTb
— HinduPost (@hindupost) January 5, 2023
अ. काही मासांपूर्वी पीडितेच्या पालकांनी तिची ख्रिस्ती धर्मप्रचारक अॅड्यू याच्याशी तिची ओळख करून दिली होती. पालकांनी पीडिता आणि तिचा भाऊ यांना ख्रिस्ती धर्मप्रचारकाच्या वसतीगृहात पाठवले.
आ. १४ डिसेंबर २०२२ या दिवशी पीडितेचा भाऊ शाळेत गेला होता. पीडित मुलीला बरे वाटत नसल्यामुळे ती वसतीगृहातील तिच्या खोलीत विश्रांती घेत होती. त्या वेळी पाद्री अॅड्यूज फेर्या घालत असतांना त्याने पीडित मुलीला पाहिले आणि त्याने खोलीत जाऊन तिच्यावर बलात्कार केला.
इ. ‘याविषयी कुणालाही सांगू नकोस’, अशी धमकीही त्याने दिली.
संपादकीय भूमिका
|