अमेरिकेतून बंगाल येथे परतलेले ४ जण बीएफ्.७ विषाणूने संक्रमित
कोलकाता – अमेरिकेतून बंगालमध्ये परतलेल्या ४ जण कोरोनाच्या बीएफ्. ७ प्रकारच्या विषाणूने संक्रमित झाल्याची माहिती आरोग्य अधिकार्यांनी दिली आहे. या चारही रुग्णांवर उपचार चाालू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या ४ रुग्णांपैकी ३ जण नदिया जिल्ह्यातील असून १ जण बिहार येथील आहे; मात्र तो सध्या कोलकाता येथे रहात आहे.