पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल देशात गर्भवती खासदाराच्या पोटात लाथ मारणार्या २ खासदारांना कारावास !
डकार – येथील संसदेत अर्थसंकल्पावर चर्चा चालू होती. चर्चेच्या वेळी खासदारांमध्ये वाद-विवाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर मामाडो नियांग आणि मसाता सांब या २ खासदारांनी गर्भवती असलेल्या महिला खासदार एमी नादिये यांच्या पोटावर लाथ मारली. यामुळे त्या बेशुद्ध पडल्या. या प्रकरणी मामाडो नियांग आणि मसाता सांब या दोन्ही खासदारांना शिक्षा घोषित झाली असून त्यांना कारागृहात डांबण्यात आले आहे. या दोन्ही खासदारांना ६ मासांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Watch: Senegalese MPs attack and kick a pregnant legislator in parliament over her remarks on an influential Muslim leader, jailed https://t.co/ayvHPClLVS
— OpIndia.com (@OpIndia_com) January 4, 2023
नियांग आणि सांब यांना नादिये यांना ८ सहस्र १०० डॉलर (६ लाख ४८ सहस्र रुपये) देण्याचा आदेश दिला आहे.
संपादकीय भूमिका
|