फ्रान्सच्या ‘शार्ली हेब्दो’कडून आता इराणचे प्रमुख खामेनी यांचे व्यंगचित्र प्रदर्शित !
इराणने फ्रान्सच्या राजदूतांना विचारला जाब !
पॅरिस (फ्रान्स) – फ्रान्समधील ‘शार्ली हेब्दो’ या नियतकालिकाने महंमद पैगंबर यांच्या व्यंगचित्रानंतर आता इराणचे प्रमुख नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या इराणने त्याच्या देशातील फ्रान्सच्या राजदूताला याचा जाब विचारला आहे. फ्रान्सकडून अद्याप या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.
Iran warns France over ‘insulting’ cartoons depicting supreme leader Ali Khamenei https://t.co/RWD0P0swCy
— Guardian news (@guardiannews) January 4, 2023
१. इराणचे परराष्ट्रमंत्री हुसैन आमीर अब्दुल्लाहियन यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, इराणच्या धार्मिक आणि राजकीय नेतृत्वाच्या विरोधात फ्रान्समधील नियतकालिकाच्या अवमान करणार्या वागणुकीला उत्तर दिले जाईल. फ्रान्स सरकारने मर्यादेत रहावे. फ्रान्स सरकारने निश्चितच चुकीचा मार्ग निवडला आहे. यापूर्वीही आम्ही या नियतकालिकाला बंदीच्या सूचीमध्ये घातले आहे.
२. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नासेर कनानी म्हणाले की, अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली इस्लामी देशांतील पावित्र गोष्टींचा अवमान करण्याचा फ्रान्सला कोणताही अधिकार नाही. फ्रान्सच्या या नियतकालिकाच्या विरोधात फ्रान्स सरकारकडून उत्तर आणि कारवाई करण्याची इराण सरकार वाट पहात आहेत.
इराणमधील हिजाबविरोधाच्या मागील सत्य दाखवण्याचा प्रयत्न ! – शार्ली हेब्दो
इराणच्या चेतावणीनंतरही शार्ली हेब्दोने म्हटले आहे की, इराणमध्ये हिजाबच्या विरोधात चालू असलेल्या निदर्शनांमागील सत्य दाखवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. वर्ष १९७९ पासून इराणमध्ये जी विचारसरणी लोकांना त्रात देत आहे, तिच्यापासून स्वातंत्र्य मिळण्यासाठी लोक जीव हातावर घेऊन निदर्शने करत आहेत. त्यांना समर्थन देण्याचा हा आमचा एक प्रयत्न आहे.