दादर (मुंबई) येथे फेरीवाल्यांकडून हफ्ते वसूल करणार्या धर्मांधाला भाजपच्या कार्यकर्त्यांकडून चोप !
आतंकवादी कारवायांना पैसे पुरवठा होत असल्याचा गंभीर आरोप !
मुंबई, ५ जानेवारी (वार्ता.) – दादर परिसरात फेरीवाल्यांकडून हफ्ते वसूल करणार्या शमशुद्दीन याला भाजपच्या माहीम विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षा अक्षता तेंडुलकर यांसह भाजपच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला. दादर परिसरात धर्मांधांनी त्यांचे बस्तान बसवले असून स्थानिक फेरीवाल्यांकडून ते हफ्ते वसुलीचे काम करत आहेत. बांगलादेशी घुसखोरांची सोय करण्यासह धर्मांधांकडून आतंकवादी कारवायांना पैसे पुरवले जात आहेत, असा गंभीर अक्षता तेंडुलकर यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला माहिती देतांना केला.
सौजन्य : Aaj Ka Mahanagar News
या वेळी अक्षता तेंडुलकर म्हणाल्या, ‘‘दादर भागातील कबुतरखाना परिसरात जमाल आणि शमशुद्दीन हे धर्मांध बांगलादेशी घुसखोरांची रहाण्याची अन् खाण्याची सोय करतात. या विरोधात वारंवार पोलिसांत तक्रार करूनही कारवाई न झाल्यामुळे आम्हाला त्यांना चोप द्यावा लागला. रेल्वेस्थानकापासून १५० मीटरपर्यंतचे क्षेत्र फेरीवाल्यांसाठी निषिद्ध आहे. असे असतांना दादर रेल्वेस्थानकाला लागून अनेक फेरीवाले आहेत. मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी कारवाईसाठी येतात, तेव्हा यांच्या समवेत शमशुद्दीन असतो. महानगरपालिकेचा कर्मचारी नसतांना कुणाची गाडी उचलायची, कुणाची उचलायची नाही, किती पैसे घ्यायचे, हे शमशुद्दीन सांगतो. याविषयी आम्ही पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार आहोत.’’ (प्रशासनावरही स्वतःचा हक्क गाजवून उद्दामपणा करणारे धर्मांध ! – संपादक)
संपादकीय भूमिका‘अशा धर्मांधांवर पोलीस कारवाई करत नाहीत; कारण तेही धर्मांधांच्या हफ्ते वसुलीत सहभागी असतात’, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? |