मशिदीवरील भोंग्याच्या आवाजाला कंटाळून पानबाजार, कुडाळ येथील बाळा राणे यांचा दुकान विकण्याचा निर्णय !
निवेदन देऊनही पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
कुडाळ (सिंधुदुर्ग) – शहरातील पानबाजार येथील सामाजिक कार्यकर्ते बाळा राणे यांनी येथील मशिदीवरील भोंग्याच्या सततच्या आवाजामुळे होणार्या त्रासाविषयी पोलिसांना सांगूनही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी राणे यांनी ‘दुकान गाळा विकणे आहे’, अशा आशयाचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक आणि प्रशासन यांना दिले आहे. याविषयी त्यांनी सामाजिक माध्यमांतूनही आवाज उठवला आहे.
याविषयी राणे यांनी म्हटले आहे की, मी पानबाजार येथे रहातो. येथे मोक्याच्या ठिकाणी माझा दुकान गाळा आहे. येथे प्रचंड मोठ्या आवाजात वाजणार्या मशिदींवरील भोंग्याच्या त्रासाला कंटाळून हा दुकान गाळा योग्य किंमत आल्यास तातडीने विकून २७ जानेवारीपासून माझ्या मूळ गावी रहाण्यास जाण्याचा निर्णय मी घेतला आहे. माणसांपासून अलिप्त राहून वास्तव्य करण्याचे मी ठरवले असले, तरी माझे सामाजिक कार्य चालूच रहाणार आहे.
श्री. बाळा राणे यांनी पोलिसांना दिलेले निवेदन –
भोंगा कोणत्याही ठिकाणचा असो, त्याचा आवाज किती ठेवावा ? हा माणुसकीचा भाग आहे. याविषयी वारंवार संपर्क करून आणि निवेदने देऊनसुद्धा कुडाळ पोलीस ठाण्यातून कोणतीही सकारात्मक कृती होत नाही, ही सामाजिकदृष्ट्या अतिशय गंभीर आणि चिंतेची गोष्ट आहे.
संपादकीय भूमिका
|