‘प्रत्येक साधकाची आध्यात्मिक प्रगती व्हावी’, यासाठी तळमळीने प्रयत्न करणार्या पुणे येथील सौ. मनीषा महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के)!
१. श्री. चैतन्य तागडे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), पुणे
१ अ. इतरांना समजून घेणे : ‘लहान मुले, तरुण अथवा वयस्कर साधक असो, सौ. मनीषाताई प्रत्येक साधकाला त्याच्या स्थितीनुसार समजून घेते. ‘साधकांच्या प्रकृतीनुसार त्यांनी साधनेचे कसे प्रयत्न करावेत ?’, याचे ताई मार्गदर्शन करते. त्यामुळे सेवा अल्प-अधिक करणारा कोणताही साधक असो, प्रत्येकाला मनीषाताईचा पुष्कळ आधार वाटतो.
१ आ. ताईने हक्काने सेवा सांगितल्यावर तिचा आधार वाटणे : माझ्या व्यावसायिक व्यस्ततेमुळे काही काळ मी अधिक वेळ देऊन सेवा करू शकत नव्हतो. कधी तातडीची सेवा असेल, तर तेवढ्यापुरते नियोजन पालटून मला सेवेला वेळ देता येत असे. अशा वेळी मला ताई हक्काने सेवा सांगत असे. त्यामुळे ताईचा मला पुष्कळ आधार वाटायचा.
१ इ. ताई घेत असलेल्या ‘ऑनलाईन’ गुरुलीला सत्संगा’मुळे साधकांमध्ये सकारात्मक पालट होणे : कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या दळणवळण बंदीच्या काळापासून मनीषाताई प्रतिदिन जिल्ह्यातील सर्व साधकांसाठी ‘ऑनलाईन’ गुरुलीला सत्संग’ घेत आहे. त्यामुळे साधकांच्या वागण्या-बोलण्यामध्ये सहजता आली. सर्व साधकांमध्ये व्यष्टी साधनेचे गांभीर्य वाढले. साधकांमधील संघभाव वाढला. सत्संगामध्ये कधीही न बोलणारे साधक या सत्संगात मोकळेपणाने बोलायला लागले.
१ ई. परिस्थिती स्वीकारणे : ताईला तीव्र शारीरिक त्रास आहेत, तरी मी तिला कधीही प्रतिक्रिया व्यक्त करतांना किंवा गार्हाणे करतांना ऐकले नाही. स्वतःची शारीरिक स्थिती स्वीकारून ती झोकून देऊन तीव्र तळमळीने सेवा करते.
१ उ. ‘साधकांची आध्यात्मिक प्रगती व्हावी’, अशी तळमळ असणे : ‘मला स्वतःलासुद्धा माझी आध्यात्मिक प्रगती व्हावी’, अशी तळमळ अल्प होती; पण ताईने मला अनेक वेळा सांगितले, ‘‘चैतन्य, आता तू आध्यात्मिक प्रगतीचे ध्येय घे.’’ यातून ‘ताईमध्ये प्रत्येक साधकाची प्रगती व्हावी’, हा समष्टी भाव आहे’, हे मला शिकायला मिळाले.
१ ऊ. तत्त्वनिष्ठता : एखादा साधक नुसतीच पुष्कळ सेवा करत असेल आणि जर त्याच्याकडून सतत चुका होत असतील, तर ताई त्या साधकाला मानसिक स्तरावर न सांभाळता तत्त्वनिष्ठपणे त्याच्या चुका सांगते. परात्पर गुरु डॉ. आठवले सांगतात, ‘साधकाची साधना व्हायला हवी, केवळ कार्य नको.’ तसेेच ताईही साधकांना समजावून सांगते.
१ ए. संतांप्रतीचा भाव : मनीषाताईचा संतांप्रती पुष्कळ भाव आहे. संतांनी सांगितलेली सूत्रे सांगतांना ताईचा भाव जागृत होतो आणि ती ऐकणार्या साधकांचाही भाव जागृत होतो. संतांचे मन जिंकण्यासाठी ताई सर्व साधकांना झोकून देऊन साधना करण्यासाठी सतत प्रोत्साहन देते.
१ ऐ. ताईशी संवाद साधल्यावर माझा उत्साह पुष्कळ वाढतो आणि ताईप्रमाणे गुरुचरणी समर्पित होण्याची तळमळ वाढते.
‘हे गुरुमाऊली, ‘केवळ आपल्या अपार कृपेने मनीषाताईकडून शिकायला मिळालेली सूत्रे मला लिहिता आली’, याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘मनीषाताईप्रमाणे आम्हालाही सर्व अडथळ्यांवर मात करून गुरुचरणी समर्पित होता येऊ दे’, हीच आपल्या पावन चरणी शरणागतभावे प्रार्थना आहे.’
२. सौ. स्नेहल केतन पाटील (पूर्वाश्रमीची कु. स्नेहल गुब्याड, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), पुणे
२ अ. ‘गुरुलीला सत्संगा’च्या माध्यमातून साधकांना साधनेत साहाय्य करणारी मनीषाताई !
२ अ १. ‘गुरुलीला सत्संगा’त ‘ताईच्या रूपात प.पू. गुरुदेवच बोलत असतात’, असे जाणवणे : ‘मनीषाताई घेत असलेल्या ‘गुरुलीला सत्संगा’त ‘ताईच्या रूपात साक्षात् प.पू. गुरुदेवच बोलत असतात’, असे मला जाणवते. ताईने सत्संगात सांगितलेले प्रत्येक सूत्र अंतर्मनापर्यंत जाते. ती आईच्या प्रेमाने आणि नम्रतेने सत्संगात बोलत असते.
२ अ २. ‘स्वभावदोष-अहं यांची व्याप्ती काढणे पुष्कळ अवघड आहे’, असे मला वाटायचे. ‘ते सोपे आणि आनंददायी कसे आहे ?’, हे ताईने मला शिकवले.
२ अ ३. ‘प्रतिमा जपणे’ या अहंच्या पैलूमुळे सेवेतील अडचणी आणि चुका सांगायला न जमणे, ताईने ‘देवाला सगळे कळते’, असे सांगणे आणि त्यानंतर सर्वांनी मनातील प्रतिमेचे विचार सांगितल्यावर सर्वांचे मन हलके होणे : ‘मला माझ्यातील ‘प्रतिमा जपणे’ या अहंच्या पैलूमुळे सेवेतील अडचणी आणि चुका सांगणे जमत नव्हते. त्याविषयी ताई मला म्हणाली, ‘‘देवासमोर कसली प्रतिमा ठेवायची ? देवाला सगळे कळते.’’ त्यानंतर ताईने सर्व साधकांना ‘प्रतिमा जपणे’ या अहंच्या पैलूची व्याप्ती काढायला सांगितली. प्रत्येक साधक सत्संगात प्रांजळपणे स्वतःच्या मनात येणारे प्रतिमेचे विचार सांगत होता. यातून देवानेच आम्हाला प्रतिमा तोडून बोलायला शिकवले आणि त्यामुळे आमचे मन हलके झाले.
२ अ ४. ताईने ‘प्रत्येक कृतीतून आनंद कसा घ्यायचा ?’, हे शिकवणे : त्यानंतर ‘आपण आनंदी फूल होण्यासाठी कसे प्रयत्न करूया ?’, हे ताईने सुंदररित्या सांगितले. ‘प्रत्येक छोटी कृती, निसर्ग, भजन ऐकणे, नामजप करणे आणि भाव ठेवणे’, यांतील आनंद कसा घ्यायचा ?’, हे तिने शिकवले. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे आनंदस्वरूप आहेत. तसे आपल्याला बनायचे आहे’, असे ताईचे अमूल्य मार्गदर्शन आम्हाला मिळाले.
२ अ ५. निर्जीव वस्तूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला शिकवणे : ‘निर्जीव वस्तूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, त्यांची क्षमायाचना करणे’, यांतून आपल्याला अंतर्बाह्य पालटायचे आहे’, हे तिने आमच्या मनावर बिंबवले. ‘वही, पेन, कपडे आणि आसंदी इत्यादी सर्वच देवाने दिलेले आहे’, हे सांगतांना तिची भावजागृती होते.
२ अ ६. ‘जे झाले, ते देवामुळेच झाले असून त्याप्रती कृतज्ञ राहूया’, असे ताईने सांगणे : ताई सांगते, ‘‘मी एखादी सेवा करते; पण मला ग्रंथसंकलन आणि चित्र काढायला कुठे जमते ? मला बांधकाम, तसेच १०० साधकांचे भोजन बनवता येते का ? नाही ना ? मग कसला कर्तेपणा घ्यायचा ? जे झाले, ते देवामुळेच झाले असून त्याप्रती कृतज्ञ राहूया.’’
२ अ ७. ताई सत्संग घेतांना पुष्कळ चैतन्य जाणवते. एकदा तर ‘तिच्या जागी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ बोलत आहेत’, असे सर्वांना जाणवले.
२ अ ८. अहं अल्प असल्याचे जाणवणे : सत्संगात साधक ताईमुळे पालट झाल्याचे सांगतात. तेव्हा ती नेहमी म्हणते, ‘‘मला काही येत नाही. सर्व परम पूज्यच करतात. मीही तुमच्यासारखीच आहे. शिकत आहे’’ यातून ‘तिचा अहं किती अल्प आहे !’, हे लक्षात येते.
‘प.पू. गुरुदेव, ‘तुमच्याच कृपेने आम्हा साधकांना मनीषाताईचा सत्संग लाभतो. हे भगवंता, तुझ्या या अगाध लीलेबद्दल आणि गुरुलीला सत्संगाप्रती तुझ्या चरणी कृतज्ञता !’
३. सौ. प्रीती कुलकर्णी, पुणे
३ अ. मनीषाताईच्या प्रयत्नांमुळे सर्व साधकांच्या व्यष्टी साधनेची घडी बसायला आरंभ होणे आणि साधकांना सेवेतील आनंदही अनुभवता येणे : ‘दळणवळण बंदी चालू होण्याआधीच गुरुकृपेने सर्वच साधकांसाठी प्रतिदिन व्यष्टी साधनेचे आढावे चालू झाले होते. मनीषाताई साधकांना सतत व्यष्टी साधनेचे महत्त्व आणि गांभीर्य यांची जाणीव करून देत असे. आम्हा सर्वच साधकांना त्याचाही लाभ झाला. ‘ताई बोलते, तेव्हा तिच्या वाणीतून आमच्यावर गुरुदेवांच्या चैतन्याचा वर्षाव होत आहे’, असे मला जाणवते.
या सगळ्याचा परिणाम, म्हणजे साधकांची व्यष्टी साधनेची घडी बसण्यासह साधक सगळ्याच सेवा भावाच्या स्तरावर करू शकत आहेत. आम्ही सर्व साधक सेवेतील आनंदही अनुभवू शकत आहोत.
३ आ. साधकांकडून स्वभावदोष आणि अहं यांच्या पैलूचा अभ्यास करवून घेणे आणि ‘प्रत्यक्ष कृती करून स्वतःत काय पालट जाणवला ?’, हे सत्संगात सांगायला सांगणे : ताईने सत्संगात साधकांकडून प्रत्येक स्वभावदोष आणि अहं यांच्या पैलूचा बारकाव्यानिशी अभ्यास करवून घेतला. तिने साधकांना प्रत्यक्ष कृतीच्या स्तरावर प्रयत्न करायला उद्युक्त केले. त्याचा साधकांना पुष्कळ लाभ झाला. ‘प्रत्यक्ष कृती करून स्वतःत काय पालट जाणवला ?’, हे तिने सत्संगात सांगायला सांगितले. त्यामुळे एकमेकांच्या प्रयत्नांतूनही साधक शिकू लागले.
३ इ. ‘गुरुलीला सत्संगा’मुळे प्रासंगिक सेवा करणार्या साधकांच्या सेवेतही वाढ झाली.
३ ई. तीव्र शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास असूनही त्याची पर्वा न करता दिवस-रात्र साधकांच्या सेवेत मग्न असणार्या सौ. मनीषा ताई ! : ‘आम्हा सर्वच साधकांचा संघभाव वाढावा, प्रत्येक जिवाचा उद्धार व्हावा’, यासाठी मनीषाताई अखंड धडपडत असते. ताईला तीव्र शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास असूनही त्याची पर्वा न करता ती दिवस-रात्र साधकांच्या सेवेत मग्न असते. ‘ताई समष्टीशी एकरूप झाली आहे’, असे मला जाणवते. हे करतांना ताईला गुरुस्मरण आणि गुरुचरण यांचा ध्यास असतो. ‘गुरुसेवा’ हा ताईचा प्राण आहे. ‘प्रारंभ, मध्य आणि शेवट केवळ प.पू. गुरुदेवच आहेत’, असेच ताई अखंड सांगते.’
(सर्व सूत्रांचे वर्ष : मे २०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |