श्रीरामप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने पनवेल ते कल्याण मशाल यात्रेचे आयोजन !
ठाणे, ४ जानेवारी (वार्ता.) – हिंदूंनी पाश्चिमात्यांचे अंधानुकरण न करता देव, देश आणि धर्म यांसाठी कार्यरत होण्याच्या दृष्टीने
श्रीरामप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेच्या गडदुर्ग समितीच्या वतीने १ जानेवारी या दिवशी मशाल यात्रा काढण्यात आली. पनवेल येथील कलावंती दुर्ग ते कल्याण येथील दुर्गाडी गड असे ५९ कि.मी. अंतर मशाल यात्रेत सहभागी झालेल्यांनी पार केले. यात्रा दुर्गाडीदेवीच्या मंदिरात पोचल्यावर ‘हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी शक्ती दे’, असा आशीर्वाद मागून सर्वांनी महाआरती केली.