भाजपचे नेते माधव भंडारी यांच्या पत्नी सुमित्रा भंडारी यांचे पुणे येथे अल्पशा आजाराने निधन
पुणे – भाजपचे नेते माधव भंडारी यांच्या पत्नी सुमित्रा भंडारी यांचे ३ जानेवारी या दिवशी वयाच्या ६० व्या वर्षी पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. सुमित्रा भंडारी या परभणी येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक नानासाहेब वेलणकर यांच्या कन्या होत्या. विविध समाजकार्यातही त्या कार्यरत होत्या. विद्यार्थिनी असल्यापासून त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून काम करत होत्या. विवाहानंतर त्यांनी पुणे, कोकण भागांमध्ये विविध सामाजिक संघटनांसमवेत कार्य केले. भाजपचे अनेक नेते आणि कार्यकर्ते यांनी सुमित्रा भंडारी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. त्यांच्या पार्थिववावर ४ जानेवारी या दिवशी येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.