परात्पर गुरु डॉ. आठवले इतर संतांप्रमाणे समाजात इतरांना न भेटण्याचे कारण !
‘तुम्ही इतर संतांप्रमाणे समाजात कुणाला का भेटत नाही ?’, असा प्रश्न काही जणांनी मला विचारला होता. त्याचे उत्तर असे की, मी भेटल्यानंतर स्थळ-काळानुसार फारच मर्यादित लोकांना भेटीचा खरा लाभ होतो. इतरांना न भेटता मी अधिकाधिक वेळ ग्रंथलिखाणाची सेवा करत असतो. त्यामुळे आतापर्यंत ३६० ग्रंथांच्या १७ भाषांत ९२ लाख ११ सहस्र प्रती प्रकाशित झाल्या आहेत. त्यांचा लाभ जगभरातील सहस्रो जिज्ञासूंना होत आहे. तसा लाभ पुढे शेकडो वर्षे लाखो जिज्ञासूंना होणार आहे.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले