श्री काळेश्वरी (मांढरदेव) आणि दावजी बुवा येथील यात्रांच्या कालावधीत वाद्य वाजवण्यावर बंदी !
तेल वहाणे आणि श्रीफळ वाढवणे, यांवरही बंदी
सातारा, ४ जानेवारी (वार्ता.) – वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्री काळेश्वरीदेवी आणि सुरूर येथील दावजी बुवा यांच्या यात्रा ५ ते ७ जानेवारी या कालावधीत पार पडणार आहेत. या कालावधीत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४४ मधील अधिकारान्वये तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी रणजित भोसले यांनी यात्रा कालावधीत वाद्य वाजवण्याविषयी प्रतिबंधात्मक आदेश प्रसारित करण्यात आले आहेत.
या आदेशात म्हटले आहे की, यात्राकाळात मांढरदेव परिसरात कोणतेही वाद्य आणण्यास आणि वाजवण्यास बंदी आहे. यासह मंदिर परिसरात तेल वहाणे, श्रीफळ वाढवणे आदी कृत्यांवरही बंदी आहे. कोंबड्या, बकर्या, बोकड आदी प्राण्यांना वाहनांतून आणण्यास, त्यांचा बळी देण्यास, त्यांची हत्या करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या आदेशांचा भंग केल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
संपादकीय भूमिकाएरव्ही मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई न करणारे प्रशासन हिंदूंच्या यात्रांत वाद्य वाजवण्यावर मात्र बंदी घालते, हे लक्षात घ्या ! प्रशासन असे निर्बंध कधी अन्य पंथियांच्या उत्सवांच्या वेळी घालते का ? |