पोलीस आणि पुरातत्व विभाग यांच्या देखत लोहगडावर अवैधपणे उभारण्यात येत आहे दर्गा !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या संकेतस्थळावर लेखमालिका वाचा !
गड-दुर्ग यांना इस्लामची धार्मिक केंद्रे बनवून छत्रपती शिवरायांचा पराक्रम झाकोळण्याचे आणि हिंदूंना षंढ बनवण्याचे षड्यंत्र ओळखा !
गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील गड-दुर्ग यांवर एखादे थडगे किंवा मजार बांधणे, तेथे ऊरूस चालू करणे आणि त्यानंतर दर्गा बाधून तेथे धार्मिक स्थळ निर्माण करणे असे प्रकार एका ठराविक पद्धतीनुसार चालू आहेत. गड-दुर्ग इस्लामची धार्मिक केंद्रे बनवून छत्रपती शिवरायांचा पराक्रम झाकोळून हिंदूंना तेजोहीन करण्याचे हे नियोजित षड्यंत्र असल्याचे दिसून येत आहे. सध्याचे महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील गड-दुर्ग यांवरील अतिक्रमण हटवण्याची केलेली घोषणा स्वागतार्ह आहे. या इस्लामिक अतिक्रमणाची भयावहता लक्षात यावी, यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’ मधून याविषयीची माहिती क्रमश: प्रसिद्ध करत आहोत. या गड-दुर्गांवरील अतिक्रमणही राज्यशासनाने हटवावे, अशी समस्त दुर्गप्रेमींची मागणी आहे. ४ जानेवारी २०२३ या दिवशी आपण ‘मलंगबाबांच्या समाधीवर दर्गा बांधून संपूर्ण मलंगगड कह्यात घेण्याचा डाव’ याविषयीचा लेख वाचला. आज ‘लोहगडावर अवैधपणे उभारण्यात येत आहे दर्गा’ याविषयीचा लेख येथे देत आहोत.
(भाग ४)
(भाग ३. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/641992.html)
पुणे जिल्ह्यातील लोहगडावर काही वर्षांपूर्वी अवैधरित्या बांधण्यात आलेल्या थडग्यावर सध्या दर्गा उभारण्याचे काम चालू आहे. आतापर्यंत दर्ग्याचे अर्धे बांधकाम पूर्ण झाले आहे. गंभीर गोष्ट म्हणजे पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि पोलीस यांच्या देखत या अवैध दर्ग्याचे बांधकाम उभे रहात आहे. कोरोनाच्या काळात गडावर प्रवेशबंदी असतांनाही या थडग्याभोवती ५-६ फूट उंचीच्या पक्क्या भिंती उभारण्यात आल्या आहेत.
गडावर उरूस साजरा करण्याची अनुमती नसतांनाही तो केला जाणे
मागील काही वर्षांपासून येथे ‘हाजी हजरत उमरशहावली बाबा दर्गा’कडून अवैधरित्या उरूस साजरा केला जात आहे. १३ डिसेंबर २०१८ या दिवशी भारतीय पुरातत्व विभागाकडून मुंबईच्या पुरातत्व विभागाला ‘गडावर उरूस किंवा अन्य कोणताही धार्मिक विधी करू नये’, असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे. गडाच्या संरक्षणासाठी असलेल्या पुरातत्व विभागाच्या कर्मचार्याने गडावरील अवैध बांधकामाविषयी विभागाकडे लेखी तक्रार केली आहे. स्थानिक दुर्गप्रेमींनीही पोलीस आणि पुरातत्व विभाग यांच्याकडे वारंवार लेखी तक्रार केल्या आहेत. पोलीस आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी यांनी गडावर येऊन पहाणीही केली आहे; मात्र गडावरील या अवैध बांधकामावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. साधारण २५ वर्षांपूर्वी या गडावर एक थडगे बांधण्यात आले. त्यानंतर काही दिवसांनी तेथे एका मुसलमान फकीराला बसवण्यात आले. काही वर्षांपासून या थडग्यावर मोठा तंबू उभारून स्थानिकांना मांसाचे जेवण, तसेच मद्य देण्यात येत होते. याविषयीची वृत्तेही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली आहेत, तसचे स्थानिक दुर्गप्रेमींनी याविषयीच्या लेखी तक्रारीही पुरातत्व विभागाकडे केल्या आहेत. सद्यःस्थितीत या थडग्यावर दर्गा बांधण्याचे काम चालू आहे. गडावरीलच गडकोटाचे दगड वापरून दर्ग्याच्या भिंती बांधण्यात आल्या आहेत. पोलीस आणि पुरातत्व विभाग यांच्या दुर्लक्षामुळे लोहगडावर हा अवैध दर्गा उभारण्यात येत आहे.
(भाग ५. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/642588.html)