स्त्रियांनी गायत्रीमंत्र का म्हणू नये ? : जाणून घ्या शास्त्रीय कारण
कर्मकांड हा साधनेतील प्राथमिक परंतु अविभाज्य असा भाग आहे. कर्मकांडात पाळावयाचे विविध नियम, आचरण कसे असावे याविषयी बहुतेकांना माहिती असते; परंतु त्यामागील कारण अन् शास्त्र यांविषयी आपण अनभिज्ञ असतो. प्रत्येक कृतीमागील शास्त्र लक्षात आल्यास देवावरील श्रद्धा वाढण्यास साहाय्य होते. या दृष्टीने सनातन संस्थेचे प्रेरणास्थान सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी समाजातील सर्वसाधारण प्रश्नांची दिलेली उत्तरे येथे साभार देत आहेत.
प्रश्न : स्त्रियांनी गुरुचरित्राचे वाचन करू नये, गायत्रीमंत्र म्हणू नये, या पाठीमागचे कारण काय ?
उत्तर : सध्याच्या काळात स्त्रिया पुरुषांसारखे वागण्याचा प्रयत्न करतात. आम्हालाही पुरुषांसारखे हक्क हवेत म्हणून लढतांना दिसतात. देह तर दोघांचे निराळेच असतात. पुरुषांची जननेंद्रीये बाहेरच्या बाजूला आहेत, तर स्त्रियांची जननेंद्रीये आतल्या बाजूला आहेत, उदा. गर्भाशय. कोणतीही साधना म्हणजे तपश्चर्या आहे, तप आहे, त्यातून उष्णता निर्माण होत असते. त्याचा पुरुषांच्या जननेंद्रियांवर काही परिणाम होत नाही; कारण ती बाहेरच्या बाजूला असतात. हवा लागत असते. त्यामुळे त्यांचे तापमान अल्प असते; मात्र स्त्रियांची जननेंद्रीये आतल्या बाजूस असल्यामुळे अधिक तापमानाला जास्त काळ कार्य करू शकत नाही. त्यामुळे कुणी गायत्रीची किंवा ओंकाराची साधना, सूर्योपासना अशा तीव्र साधना केल्यास जवळजवळ २ प्रतिशत स्त्रियांना गर्भाशयाचे विकार चालू होतात. स्त्रीबीज निर्माण करणार्या ज्या ग्रंथी आहेत, त्यांचे विकार चालू होतात. पाळीच्या वेळेला कुठले ना कुठले त्रास होतात. गुरूंनी जर कुणाला अशा प्रकारची साधना सांगितली, तर प्रश्नच येत नाही; कारण गुरूंना सर्व ठाऊक असते, कुणी काय करणे आवश्यक आहे. कोणत्यातरी कारणामुळे शरिराचा एखादा विकार झाला, तर प्रतिजैविके घेऊन तो ठीक करता येतो; परंतु या शक्तींमुळे काहीतरी त्रास निर्माण झाल्यास तिथे वैद्य काही साहाय्य नाही करू शकत; म्हणून असे करण्यापेक्षा आपल्या परंपरेने जे सांगितले आहे, ते करावे, म्हणजे देवतेच्या नामापुढे ॐ लावणे टाळावे. ‘ॐ नमः शिवाय ।’ ऐवजी नुसतेच ‘नमः शिवाय ।’ म्हणावे. गायत्रीची उपासना करणे टाळावे.
(अध्यात्मातील सैद्धांतिक भागाचा कितीही अभ्यास केला, तरी मनातील शंकांचे निरसन झाले नाही तर साधना नीट होत नाही. या दृष्टीने गांवोगांवच्या जिज्ञासू आणि साधकांच्या मनात सर्वसाधारणपणे उद्भवणार्या अध्यात्मशास्त्राच्या सैद्धांतिक आणि प्रायोगिक भागाच्या शंकांचे सनातन संस्थेचे प्रेरणास्थान सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी निरसन केले आहे. याचा अभ्यास करून अधिकाधिक जिज्ञासूंनी योग्य साधनेला आरंभ करावा आणि जीवनाचे खर्या अर्थाने सार्थक करून घ्यावे, हीच श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !)
साभार : ‘सनातन संस्थे’चे संकेतस्थळ Sanatan.org (सनातन डॉट ऑर्ग)
#गायत्रीमंत्र #gayatrimantra #shankanirsan #शंकानिरसन #गायत्री उपासना