अजित पवार यांच्या विरोधात गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथे निदर्शने !
गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) – विरोधी पक्षनेते, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज हे कधीच धर्मवीर नसल्याचे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत भाजपच्या वतीने दसरा चौकात निदर्शने करण्यात आली. या प्रसंगी शहराध्यक्ष राजेंद्र तारळे म्हणाले, ‘‘छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदु धर्मरक्षणासाठी प्राणाचे बलीदान दिले, हे सर्वज्ञात आहे. असे असतांना त्यांना ‘धर्मवीर नाहीत’ म्हणणे हा महाराज आणि हिंदु धर्म यांचा अवमान आहे.’’ या वेळी उपाध्यक्ष चंद्रकांत सावंत, युवा अध्यक्ष संग्राम आसबे यांनीही मनोगत व्यक्त केले.
या आंदोलनासाठी तालुकाध्यक्ष विठ्ठल पाटील, कार्याध्यक्ष प्रीतम कापसे, प्रकाश पाटील, भीमराव कोमारे, अमोल बिलावर, सुभाष पाटील, अनिल पाटील, दिगंबर विटेकरी यांसह अन्य उपस्थित होते.