नाशिक येथे भ्रमणभाष टॉवर नसतांना माजी नगरसेवकाला १३ लाखांचे घरपट्टी देयक !
महापालिकेचा भोंगळ कारभार !
नाशिक – शहरातील चुंचाळे परिसरातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक भागवत आरोटे यांच्या घरावर भ्रमणभाषचे (मोबाईल) टॉवर नाही, तरीही महापालिका प्रशासनातील घरपट्टी विभागाने त्यांना १३ लाख २५ सहस्र ८०८ रुपये घरपट्टी भरण्याविषयी थकबाकीची नोटीस पाठवली आहे. ही रक्कम न भरल्यास मिळकत जप्त करण्याची चेतावणीही देण्यात आली आहे.
‘महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत, तर महालिकेतील संबंधित अधिकारी या प्रकाराविषयी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करत आहेत’, असे आरोटे यांनी सांगितले. (माजी नगरसेवकांशी असे वागणारे महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी सर्वसामान्य जनतेशी कसे वागत असतील, याचा विचारच न केलेला बरा ! – संपादक)