रात्री घरात घुसून महिलेवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी माजलगाव पोलिसांत धर्मांधावर गुन्हा नोंद !
बीड – माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथील एका २७ वर्षीय महिलेवर रात्री घरात घुसून अत्याचार केल्याची घटना ३१ डिसेंबरच्या रात्री घडली. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाणे येथे आरोपी ताहेर शेख याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेच्या वेळी पीडित महिला मुलांसह घरात झोपली होती. ताहेर शेख याने रात्री १ वाजता बळजोरीने घरात घुसून ‘आरडाओरडा केल्यास तुझ्या लेकरांना ठार मारीन’, अशी धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. (अशा वासनांध धर्मांधांना कठोर शिक्षा देणे हीच अत्याचार रोखण्यासाठी प्रमुख उपाययोजना आहे ! – संपादक)
या वेळी आवाजाने घरातील मुले उठली असता त्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने शेजारील नागरिक धावले. त्यामुळे ताहेर शेख तेथून पळून गेला. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून ताहेर शेख याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणाचे अन्वेषण पोलीस उपनिरीक्षक निशिगंधा खुळे या करत आहेत. आरोपी अद्याप पसार आहे.