इतिहास पालटण्याच्या चालू असलेल्या प्रयत्नांचा निषेध करावा तितका थोडा ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
|
मुंबई – इतिहास पुसण्याचा किंवा पालटण्याचा जो काही प्रयत्न चालू आहे, त्याचा निषेध करावा तितका थोडा आहे, असे प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘औरंगजेब क्रूर आणि हिंदुद्वेष्टा नव्हता’, या केलेल्या विधानाविषयी मुख्यमंत्री बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘औरंगजेबाच्या संदर्भात कुणाचे प्रेम ऊतू जात आहे ? ज्या औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला, महाराष्ट्रातील अनेक मंदिरे पाडून टाकली, उद्ध्वस्त केली आणि माय-भगिनींवर अत्याचार केले, त्याचा पुळका कुणाला येत आहे ? यावरून संबंधितांची वृत्ती दिसून येते. अशांच्या वृत्तीतून त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील प्रेम दिसून येते.’’