ठाणे जिल्ह्यातील मलंगबाबांच्या समाधीवर दर्गा बांधून संपूर्ण मलंगगड कह्यात घेण्याचा डाव !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या संकेतस्थळावर लेखमालिका वाचा !
गड-दुर्ग यांना इस्लामची धार्मिक केंद्रे बनवून छत्रपती शिवरायांचा पराक्रम झाकोळण्याचे आणि हिंदूंना षंढ बनवण्याचे षड्यंत्र ओळखा !
गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील गड-दुर्ग यांवर एखादे थडगे किंवा मजार बांधणे, तेथे ऊरूस चालू करणे आणि त्यानंतर दर्गा बाधून तेथे धार्मिक स्थळ निर्माण करणे असे प्रकार एका ठराविक पद्धतीनुसार चालू आहेत. गड-दुर्ग इस्लामची धार्मिक केंद्रे बनवून छत्रपती शिवरायांचा पराक्रम झाकोळून हिंदूंना तेजोहीन करण्याचे हे नियोजित षड्यंत्र असल्याचे दिसून येत आहे. सध्याचे महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील गड-दुर्ग यांवरील अतिक्रमण हटवण्याची केलेली घोषणा स्वागतार्ह आहे. या इस्लामिक अतिक्रमणाची भयावहता लक्षात यावी, यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’ मधून याविषयीची माहिती क्रमश: प्रसिद्ध करत आहोत. या गड-दुर्गांवरील अतिक्रमणही राज्यशासनाने हटवावे, अशी समस्त दुर्गप्रेमींची मागणी आहे. ३ जानेवारी २०२३ या दिवशी आपण ‘भारतातील पहिले आरमार उभारलेल्या दुर्गाडी दुर्गावर अतिक्रमण’ याविषयीचा लेख वाचला. आज ‘मलंगबाबांच्या समाधीवर दर्गा बांधून संपूर्ण मलंगगड कह्यात घेण्याचा डाव’ याविषयीचा लेख येथे देत आहोत.
(भाग ३)
(भाग २. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/641719.html)
ठाणे जिल्ह्यातील मलंगगडावर नाथ संप्रदायाचे संस्थापक श्री मत्स्येंद्रनाथ आणि नवनाथांपैकी एक गोरक्षनाथ यांची मंदिरे आहेत. यासह जालिंदरनाथ, कानिफनाथ यांसह नवनाथांपैकी अन्य ५ नाथांच्या समाध्या आहेत. गडावर शिव, गणेश आणि श्री दुर्गादेवी यांची मंदिरेही आहेत. श्रीक्षेत्र मलंगगड हे पूर्वापार श्री नाथसंप्रदायातील साधूंचे साधना केंद्र मानले जाते; परंतु मागील काही वर्षांपासून या गडाचे इस्लामीकरण करण्याचा नियोजनबद्ध प्रयत्न चालू आहे. गडावरील मलंगबाबा यांच्या समाधीवरच मुसलमानांनी ‘हाजी अब्दुर्रहमान मलंग शाहबाबा’ यांच्या नावाचा दर्गा उभारून समाधीचे अस्तित्वच झाकोळण्यात आले आहे. श्रीक्षेत्र मलंगगडाऐवजी ‘हाजी मलंग’ असा उल्लेख प्रचलित करण्यात आला आहे. गडाच्या पायथ्यापासून ते समाधीपर्यंत मुसलमानांनी १०० हून अधिक दुकाने थाटली आहेत. गडावर मुसलमान वस्ती मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येत आहे. गडावर आणखी ४ दर्गे उभारण्यात आले आहेत. मलंगबाबांच्या समाधीला मुसलमानांच्या दुकानांनी घेरले आहे. कुणी हिंदू मलंगबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गेल्यास त्यांच्यावर दबाव आणला जातो. येथे मलंगबाबांची समाधी असल्याचा एकही फलक लावण्यात आलेला नाही. या उलट दर्ग्याला ‘हाजी मलंग’ असे नाव देण्यात आले आहे.
पेशव्यांच्या काळात या क्षेत्राच्या देखभालीचे दायित्व केतकर नावाच्या सरदाराकडे देण्यात आले होते. वर्ष १९२८ ते १९३५ या कालावधीत या स्थानाची व्यवस्था गं.भा. आत्याबाई यांच्याकडे होती. गडावर दर्शनासाठी येणार्या भाविकांमध्ये काही मुसलमानांचाही समावेश असल्यामुळे त्यांच्या सोयीसाठी येथे एक मशीद बांधण्यात आली. त्यानंतर मुसलमानांनी श्रीक्षेत्र मलंगगडाचा उल्लेख ‘हाजी मलंग’ करण्याचा प्रारंभ केला. त्यानंतर येथे सेवेसाठी असलेल्या धर्मांधांनी या जागेचे वहिवाटदार असल्याचा बनाव करून गडावर अतिक्रमण केले. केतकर कुटुंबियांचे वंशज गोपाळ केतकर यांनी ‘श्री पीर हाजी मलंगसाहेब दर्गा’ या नावाने ट्रस्ट स्थापन केला. ट्रस्टमधील धर्मांधांकडून ही जागा वक्फ मंडळाच्या अधिपत्याखाली आणण्याचे सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत. वर्ष १९८२ मध्ये पू. मोहनदादा गोखले, वामनराव वाघ आणि पांडुरंग साळुंखे यांनी श्री मलंगगड हे हिंदूंचे तीर्थ असल्याचा दावा अन् छायाचित्रासह सर्व पुरावे ठाणे जिल्हा न्यायालयात सादर केले आहेत. वर्ष २००४ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या काळात श्रीक्षेत्र मलंगगडाची भूमी वक्फ मंडळाची असल्याचे सरकारने घोषित केले. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्री. दिनेश देशमुख यांनी याविरोधात न्यायालयात याचिका केली आहे. त्यावर न्यायालयाने ही भूमी वक्फ मंडळाकडे देण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. या खटल्यातील प्रतिवादी नासीर खान यांनी श्री मलंगगडाची भूमी वक्फ मंडळाच्या नावे करण्यासाठी पुन्हा अर्ज केला. त्यावर धर्मादाय आयुक्त आणि राज्य सरकार यांनी ही भूमी वक्फ मंडळाकडे हस्तांतरित केली. या विरोधात हिंदूंनी न्यायालयात पुन्हा याचिका केली आहे.
(भाग ४. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/642301.html)