भिवंडी येथे ‘मेरी पाठशाळा’ आंदोलनात विद्यार्थ्याकडून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !
ठाणे, २ जानेवारी (वार्ता.) – भिवंडी महानगरपालिकेसमोर मागील ३ दिवसांपासून ‘मेरी पाठशाळा’ हे आंदोलन करण्यात येत होते. त्यात एका विद्यार्थ्याने त्याच्या भाषणात ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या. (भारतात राहून पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा गांभीर्याने विचार करायला हवा ! – संपादक) त्यानंतर या परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
(सौजन्य : ABP MAJHA)
पोलिसांनी हे आंदोलन तात्काळ थांबवून आयोजकांसह १४ पुरुष आणि ५ महिला यांना कह्यात घेतले आहे. आंदोलकांनी पोलिसांशी बाचाबाची केली. याविषयी पुढील अन्वेषण भिवंडी पोलीस करत असून या परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.