७ जानेवारीला श्री क्षेत्र अमृतनगर (जिल्हा कोल्हापूर) येथे श्री हनुमान उपासना !
वारणानगर (जिल्हा कोल्हापूर) – महासिद्ध शिवगुरु आश्रम द्रोणागिरी महिला बहुउद्देशीय विकास संस्था यांच्या वतीने ७ जानेवारीला श्री क्षेत्र अमृतनगर (गट क्रमांक ४१५) येथे श्री हनुमान उपासनेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपासनेत मिरज-कराड येथील दासबोध अभ्यास मंडळ सहभागी होत आहे. प.पू. तोडकर महाराज यांनी चालू केलेल्या आश्रमास १५ ऑगस्ट २०२२ या दिवशी १३ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचा प्रारंभ सकाळी ९.५५ वाजता आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने होईल. यानंतर सकाळी १० वाजता हनुमान उपासनेस प्रारंभ होईल. यात महाप्रसादाचीही सोय करण्यात आली आहे. या कार्यक्रमास येण्या-जाण्याचा व्यय साधकांनी करावयाचा असून संस्थेच्या वतीने चहा, अल्पाहार, महाप्रसाद यांची सोय करण्यात आली आहे. कार्यक्रमासाठी येणार्यांनी ९०९७३४६३०५, ८८३०२२३५४२, तसेच मिरज येथे ०२३३-२२२३९४० यावर संपर्क करून नोंद करावी. साधारणत: १ सहस्र १०० साधकांची नावे नोंद झाली की, नोंदणी थांबवण्यात येणार आहे.