पिंपरी-चिंचवडमध्ये २२ वाहनांची तोडफोड !
पोलीस कर्मचार्याला केली धक्काबुक्की !
पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) – सांगवी आणि वाकड पोलीस ठाण्याची हद्द असलेल्या रहाटणी आणि पिंपळे सौदागर येथे मध्यरात्री एकूण २० ते २२ वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. ३१ डिसेंबर असल्याने शहरात दीड सहस्रांपेक्षा अधिक पोलीस बंदोबस्त होता. तरीही ४ ते ५ जणांच्या अज्ञात टोळक्याने रिक्शातून येऊन दिसेल त्या दुचाकी आणि चारचाकीला लक्ष्य करत कोयत्याने आणि सिमेंटच्या गट्टूने प्रहार केला. घटनेनंतर तोडफोड करणार्या आरोपींना पकडण्याचा प्रयत्न वाकड पोलीस कर्मचार्याने केला; पण त्यांना धक्काबुक्की करून तोडफोड करणार्या अज्ञात व्यक्ती पसार झाल्या आहेत. या प्रकरणी सांगवी आणि वाकड पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत. (पोलिसांना मारहाण करून गुन्हेगार पसार होत असतील, तर हे पोलिसांना लज्जास्पद नव्हे का ? – संपादक)
संपादकीय भूमिकागुन्हेगारांना कायद्याचे भय नसल्याचे द्योतक ! असे गुन्हेगार कठोर शिक्षेस पात्र आहेत. पोलिसांनी यामध्ये लक्ष घालून गुन्हेगारांवर कसा वचक निर्माण होईल ? असे पहावे. |