निधनानंतरही चेहर्यावर तेज असणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पुणे येथील कै. (श्रीमती) उषादेवी रामचंद्र गोखले !
‘२८.११.२०२२ या दिवशी सकाळी माझ्या आईचे (श्रीमती उषादेवी रामचंद्र गोखले, वय ९८ वर्षे यांचे) वृद्धापकाळाने पुणे येथे माझ्या मोठ्या भावाच्या घरी निधन झाले. तिला कोणताही आजार नव्हता. तिचे प्राणोत्क्रमणही अत्यंत शांतपणे झाले. तिच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. निधनानंतर
अ. घरात दत्ताचा नामजप लावला होता.
आ. आईच्या चेहर्यावर तेज दिसत होते.
इ. घरात पुष्कळ शांत वाटत होते.
२. आईच्या निधनाच्या दुसर्या दिवशी ‘एक प्रकाशज्योत वेगाने ऊध्र्व दिशेने जात आहे’, असे दिसणे
२९.११.२०२२ या दिवशी म्हणजे आईच्या निधनाच्या दुसर्या दिवशी पहाटे नामजप करतांना ‘एक प्रकाशज्योत अतिशय वेगाने ऊध्र्व दिशेने जात आहे’, असे मला दिसले. ‘ती माझी आई आहे’, असे मी अनुभवले. तेव्हा माझे मन प्रसन्न, आनंदी आणि शांत होते.
३. आईच्या निधनानंतर दहाव्या दिवसाचे विधी करतांना पिंडाला काकस्पर्शही लगेच झाला.
४. आईच्या निधनाच्या बाराव्या दिवशी पहाटे नामजप करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांचे दर्शन होणे आणि त्यातून ‘आशीर्वादरूपी चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे साधिकेला जाणवणे
९.१२.२०२२ या दिवशी आईचा निधनानंतरचा १२ वा दिवस होता. मी पहाटे नामजप करत असतांना मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांचे दर्शन झाले. मला त्यांच्या डाव्या पायाचा अंगठा आणि त्याच्या जवळची २ बोटे यांच्या कडा प्रकाशमान दिसल्या. त्यातून ‘आशीर्वादरूपी चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी माझा नामजप अनाहतचक्रातून होत होता.
गुरुचरणी अनंत कोटी कृतज्ञता !’
– सौ. माधुरी इनामदार (मोठी मुलगी), (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के, वय ७७ वर्षे), पुणे. (११.१२.२०२२)