पाप आणि पुण्य यांचे गणित
‘थोरांवर पुष्कळ मोठे दायित्व आहे. त्यांनी धर्म सोडला, तर लोकही धर्म सोडतील, मनमानी आणि पापे करतील. त्या पातकाचा कर्ता तो महापुरुष होईल. वर्णसंकराचे ते दायित्व, तो दोष, ते पाप त्याच्यावर येईल. प्रजेला पापी बनवणारा तो दोषी होईल. अधर्माला-पापाला साहाय्य करणारा, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कशीही साथ असो, कायिक-मानसिक कसेही असो, त्याला त्या प्रमाणात ‘पापाचा’ भाग मिळतोच. तो दोषी होतोच होतो. तसेच धर्माचे-पुण्याचेही आहे. धर्मकर्म करणारे, त्याला साथ देणारे, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कशीही साथ असो, कायिक-वाचिक असो वा मानसिक असो, कसेही असो, त्याला त्या प्रमाणात पुण्य मिळते.’