सेंट्रल पार्क ते बेलापूर स्थानकांदरम्यान मेट्रोची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण !
नवी मुंबई – सिडको महामंडळाच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील मार्ग क्र. १ सेंट्रल पार्क ते बेलापूर या स्थानकांपर्यंत धावणार्या मेट्रोची चाचणी यशस्वीरित्या पार पडली. ३० डिसेंबर या दिवशी सिडको आणि महा मेट्रो यांच्या देखरेखीखाली मेट्रोची चाचणी घेण्यात आली. यामुळे संपूर्ण मार्ग क्र. १ आता लवकरच प्रवासी वाहतुकीसाठी चालू होईल.