कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू !
नवी मुंबई – भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघाची व्दिवार्षिक निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यानुसार कोकण विभागामध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितले.
१. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी पात्र शिक्षक मतदारांना नामनिर्देशन प्रविष्ट करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मतदारसूचीत नाव नोंदवता येणार आहे.
२. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील आमदार बाळाराम दत्तात्रय पाटील यांची मुदत ७ फेब्रुवारी २०२३ या दिवशी संपत आहे. निवडणूक आयोगाने २९ डिसेंबर २०२२ या दिवशी विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया घोषित केली आहे. त्यानुसार निवडणुकीची अधिसूचना ५ जानेवारी या दिवशी प्रसिद्ध होणार आहे. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक १२ जानेवारी असून १३ जानेवारीला नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे. ३० जानेवारी या दिवशी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. २ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.