तीव्र विरोधामुळे ‘सोनी लिव’ दूरचित्रवाणीच्या संकेतस्थळावरून मालिकेतील वादग्रस्त भाग हटवला !
श्रद्धा वालकर हत्याप्रकरणावर आधारित भागात आरोपीला जाणूनबुजून हिंदु दाखवल्याचे प्रकरण
मुंबई – ‘सोनी लिव’ या दूरचित्रवाणी वाहिनीवरील ‘क्राईम पेट्रोल’ या मालिकेत प्रदशित करण्यात आलेल्या भाग क्रमांक २१२ मध्ये ‘अहमदाबाद-पुणे मर्डर केस’ हा भाग श्रद्धा वालकर हत्याप्रकरणावर आधारित होता. या भागात श्रद्धा हिची हत्या करणारा ‘आफताब’ हा मुसलमान असतांना त्याला जाणूनबुजून ‘हिंदु’ दाखवण्यात आले होते, तर ‘श्रद्धा’ दलित असतांना तिला ‘ख्रिस्ती’ दाखवण्यात आले होते. यासह मुलीची हत्या करणार्या कुटुंबाला ‘धार्मिक’ दाखवण्यात आले होते. या मालिकेस सामाजिक माध्यमांवर झालेल्या तीव्र विरोधानंतर ‘सोनी लिव’ दूरचित्रवाणीच्या संकेतस्थळावरून हा भाग हटवण्यात आला आहे.
Aftab’s name changed to Mihir.
Shraddha’s name changed to Anna Fernandes.
Both get married in Temple. This is how @SonyTV Crime Patrol has showed Shradha Murder case on TV.
Producer of the Show are Congress leader miya @RajBabbar23 son in law Anup Soni & Miya Shamel Khan. pic.twitter.com/3RA3vJmHCV
— Sameet Thakkar (@thakkar_sameet) January 2, 2023
१. यामध्ये ‘आफताब’चे पात्र ‘मिहिर’ या नावाने, तर श्रद्धा हिचे पात्र ‘एना फर्नांडिस’ या ख्रिस्ती नावाने दाखवण्यात आले होते. त्यांनी मंदिरामध्ये देवीच्या मूर्तीसमोर विवाह केल्याचे, तसेच विवाहानंतर दोघेही पुणे येथे रहात असल्याचे दाखवण्यात आले होते.
२. ‘मिहिर’ने ‘एना फर्नांडिस’ हिला मारहाण केल्यावर मिहिरचे कुटुंबीय ‘एना’ हिच्या हातामध्ये देवीचा धागा बांधतात; मात्र त्यानंतर काही दिवसांनी मिहिर हा एना हिचे तुकडे करून तिची क्रूर हत्या करतो. तिचा मृतदेह शीतकपाटात ठेवून नंतर मृतदेहाची विल्हेवाट लावतो, असे दाखवण्यात आले होते.
संपादकीय भूमिका
|