‘पठाण’मधील ‘बेशरम रंग’ माझ्या जुन्या गाण्याप्रमाणे !
पाकचा गायक सज्जाद अली याचा गाणे चोरल्याचा सामाजिक माध्यमातून अप्रत्यक्ष आरोप
इस्लामाबाद (पाकिस्तान) – अभिनेते शाहरूख खान यांच्या आगामी ‘पठाण’ या चित्रपटातील भगव्या रंगाचा अवमान करणारे गाणे ‘बेशरम रंग’ याच्यावर आता पाकमधील गायक सज्जाद अली यानेही अप्रत्यक्ष टीका केली आहे.
१. सज्जाद अली याने त्याच्या इंस्टाग्राम खात्यावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात अली म्हणतो की, मी एका आगामी चित्रपटातील एक गाणे ऐकले. ते ऐकून मला माझ्याच काही वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका गाण्याची आठवण आली.’ अली यांनी यात गाण्याचा उल्लेख केला नाही; मात्र सामाजिक माध्यमांतून हे गाणे ‘बेशरम रंग’ असल्याचे म्हटले जात आहे.
२. एका व्यक्तीने लिहिले आहे की, ‘बेशरम रंग’ हे गाणे सज्जाद अली यांच्या संगीत संयोजनावर आधारित आहे. भारतातील लोक पाकिस्तानी गाणे चोरतात आणि त्यांना त्याचे महत्त्वही देत नाहीत.