अलवर (राजस्थान) येथे मेंढी चरण्यावरून मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण !
|
अलवर (राजस्थान) – येथील नारथला गावामध्ये मेंढी आणि बकरी यांच्या चरण्यावरून झालेल्या वादातून एका दलित कुटुंबावर धर्मांध मुसलमानांनी आक्रमण केले. यात २० जण घायाळ झाले.
घटनेच्या दिवशी सोहनलाल मेघवाल यांनी त्यांच्या मेंढ्या आणि बकर्या एका मंदिराजवळ चरण्यासाठी आणल्या होत्या. त्यांच्यापासून काही अंतरावर त्यांच्याच गावातील इम्रान याने त्याच्या बकर्या चरण्यासाठी आणल्या होत्या. चरता चरता सोहनलाल यांची एक मेंढी इम्रानच्या बकर्यांजवळ गेली. हे इम्रानला खटकले. त्यातून इम्रानने आणि त्याच्या भावाने या मेंढीची शेपूट कापली. यास सोहनलाल यांनी विरोध केल्यावर वाद होऊन दोन्ही बाजूंनी गर्दी गोळा झाली. यानंतर मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण केले. यात १० ते २० जण घायाळ झाले. त्याच वेळी देण्यात आलेल्या प्रत्युत्तरात मुसलमानांकडील ३-४ जण घायाळ झाले. या घटनेची तक्रार पोलिसांत करूनही पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही.
संपादकीय भूमिका
|