राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार यांना ‘धर्मवीर’ कधीच कळणार नाहीत ! – नितेश राणे, आमदार, भाजप
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा आमदार नितेश राणे यांच्याकडून ट्वीटद्वारे निषेध
कणकवली – विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नाहीत’, असे वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा मी निषेध करत आहे. राष्ट्रवादीला (राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला) आणि पवारांना ‘धर्मवीर’ कधीच कळणार नाहीत. त्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र द्यावे, अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्वीटद्वारे केली आहे.
राजीनामा दया .. pic.twitter.com/gC4Jxwejam
— nitesh rane (@NiteshNRane) January 1, 2023
आमदार राणे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आम्ही हिंदवी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना ‘धर्मवीर’च म्हणणार’, हे ‘धरणवीर’ असणारे अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीच्या मंडळींना ठणकावून सांगतो. (काही वर्षांपूर्वी दुष्काळाच्या वेळी अजित पवार यांनी पाण्यासाठी ‘धरणात लघवी करू का ?’ असे संतापजनक विधान केले होते.) ‘धरणवीर’ असणार्यांना ‘धर्मवीर’ ही पदवी कधीच कळणार नाही.