उमरे (जिल्हा रत्नागिरी) येथे एकाची ९९ सहस्र रुपयांची फसवणूक
रत्नागिरी – परत गेलेले कुरिअर थांबवण्यासाठी ‘लिंक’ पाठवून अज्ञात व्यक्तीने अनिल सनगरे यांची ९९ सहस्र रुपयांची फसवणूक केल्याची घटना ३१ डिसेंबर या दिवशी उमरे येथे घडली. याविषयी सनगरे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार अनिल सनगरे हे मीरा भाईंदर येथील एका आस्थापनेत नोकरीला आहेत. त्यांच्या आस्थापनाचे मारुति कुरिअरमध्ये आलेले कुरिअर ते उमरे येथील कार्यालयात उपस्थित नसल्यामुळे परत गेले होते. त्यामुळे सनगरे यांनी गूगलवर शोध घेऊन मारुति कुरिअरचा नंबर मिळवून त्यावर फोन केला. त्या वेळी हिंदी बोलणार्या अज्ञात व्यक्तीने ‘तुमचे कुरिअर थांबवायचे असेल, तर मला ५ रुपये पाठवा’, असे सांगितले. त्यानंतर सनगरे यांनी पैसे पाठवले; मात्र ते पोचलेे नसल्याने अज्ञाताने सनगरेना एक लिंक पाठवली. ती सनगरे यांनी स्वीकारल्यानंतर त्यांच्या अधिकोषाच्या (बँकेच्या) खात्यातून प्रथम ९० सहस्र आणि नंतर ९ सहस्र असे एकूण ९९ सहस्र रुपये ‘ऑनलाईन’ पद्धतीने गेले. या प्रकरणी अधिक अन्वेषण ग्रामीण पोलीस करत आहेत.
संपादकीय भूमिका‘ऑनलाईन’ फसवणुकीच्या वाढत्या घटनांवरून जनतेची असुरक्षितता लक्षात येते ! |