मुंबई येथे खोट्या वृत्ताद्वारे धर्मांधाकडून मालकिणीची ५२ लाखांची फसवणूक !
विश्वास ठेवण्यास लायक नसणारे धर्मांध !
मुंबई – एका पर्यटन आस्थापनाच्या गाडीतून ड्रग्ज आणि वापरलेले कंडोम पोलिसांनी जप्त केले आहेत. हे प्रकरण सोडवण्यासाठी न्यायाधिशापर्यंत पैसे द्यावे लागतील, अशी भीती घालून सोहेल खान याने त्याच्या मालकिणीकडून ५२ लाख रुपये उकळले. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्यासह त्याची पत्नी आणि आणखी एक यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.
सोहेलवरील विश्वासापोटी पीडित महिलेने आस्थापनाचे दायित्व त्याच्यावर सोपवून ती हरियाणाला निघून गेली. मधल्या काळात त्याने तिला गाडीत सापडलेल्या साहित्याविषयी सांगून ‘गाडीच्या मालकावर गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात येणार आहे’, असे सांगितले. त्याने तिच्याकडे खोटी कागदपत्रे मागितली. कारवाई टाळण्यासाठी पोलीस, अधिवक्ता आणि न्यायाधीश यांना पैसे द्यायचे असल्याचेही सांगितले. पीडित महिलेने ते झहीर नावाच्या एका एजंटच्या खात्यात पाठवले. (अशा धर्मांधांना कठोर शिक्षाच आवश्यक ! – संपादक)