‘क्राईम पेट्रोल’ मालिकेमध्ये आफताब पूनावाला हिंदु दाखवणार्या ‘सोनी टीव्ही’वर बंदी घालण्याची हिंदूंची मागणी !
(क्राईम पेट्रोल ही गुन्हे जगतातील सत्य घटनांवर आधारित एक टीव्हीवरील मालिका आहे.)
मुंबई – ‘सोनी टीव्ही’ वरील ‘क्राईम पेट्रोल’च्या एका भागामध्ये श्रद्धा वालकर हिची हत्या करून तिचे ३५ तुकडे करणारा आफताब पुनावाला याने केलेल्या गुन्ह्याचे चित्रण करण्यात आले आहे; मात्र ते करतांना त्याला त्याला हिंदु धर्मीय आणि श्रद्धा वालकर हे पात्र ख्रिस्ती दाखवल्याने संतापलेल्या हिंदूंनी ‘सोनी टीव्ही’वर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
Sony’s Crime Patrol distorts Shraddha Walkar murder case, changes Aftab to ‘Mihir’ and Shraddha to ‘Anna Fernandes’https://t.co/SPOnrMO0bm
— OpIndia.com (@OpIndia_com) December 30, 2022
१. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले होते. श्रद्धा वालकर ही आफताब पुनावाला याच्यासमवेत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये (विवाह न करता एकत्र) रहात होती. तिच्या अमानुष हत्येनंतर काही मासांनी या प्रकरणाचा उलगडा झाला होता.
२. या प्रकरणावरून ‘सोनी टीव्ही’च्या ‘क्राईम पेट्रोल’ मालिकेत एका भागाचे प्रसारण करण्यात आले आहे. क्राईम पेट्रोलच्या भागामध्ये आफताब हा हिंदु मुलगा असल्याचे दाखवण्यात आले असून या मालिकेत त्याचे नाव ‘मिहीर’ आहे, तर श्रद्धाला ख्रिस्ती असल्याचे दाखवले असून तिचे नाव ‘अॅना फर्नांडिस’ असे दाखवले आहे.
३. सोनी टीव्हीच्या या कृत्यामुळे हिंदु युवकांना जाणीवपूर्वक अपकीर्त करण्यात येत असल्याचा आरोप सामाजिक माध्यमांद्वारे अनेकजण करत आहेत.
४. ट्विटरवर सोनी टीव्हीच्या या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणीही केली जात आहे, तर सोनी टीव्हीवर बंदी आणण्याच्या मागणीसाठी ट्विटरवर #BoycottSonyTV असा ‘हॅशटॅग’ही चालवला जात आहे. (हिंदूंकडून होत असलेली ही मागणी हिंदु समाज जागृत होत असल्याचेच द्योतक आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|