‘स्वस्तिक फाऊंडेशन’च्या वतीने आयोजित निवासी शिबिरात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाकडून ‘संगीत आणि नृत्य यांचा स्वतःच्या प्रभावळीवर होणारा परिणाम’ या विषयावर मार्गदर्शन !
डिचोली (गोवा) – ‘स्वस्तिक फाऊंडेशन’च्या वतीने येथील ‘राऊत फार्म हाऊस’मध्ये संगीत शिकणार्या विद्याथ्र्यांसाठी ‘स्वरयज्ञ’च्या माध्यमातून संगीताचा सराव (रियाज) करून घेणारे ३ दिवसांचे निवासी शिबीर आयोजित करण्यात आले होते. हे शिबीर २३ ते २५ डिसेंबर या कालावधीत पार पडले. या शिबिरात २४ डिसेंबर या दिवशी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, संगीत विशारद) यांनी ‘संगीत आणि नृत्य यांचा स्वतःच्या प्रभावळीवर होणारा परिणाम’, हा संशोधनावर आधारित विषय सादर केला. या कार्यक्रमाला प्रसिद्ध प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये आणि सिंधुदुर्ग येथील वैद्य दिवाकर पंत वालावलकर उपस्थित होते. या शिबिराला गोवा आणि महाराष्ट्र येथील ६० शिबिरार्थीं उपस्थित होते. या शिबिराचे आयोजन ‘स्वस्तिक फाउंडेशन’ चे संस्थापक आणि शास्त्रीय गायक डॉ. प्रवीण गावकर यांनी केले.
या वेळी सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने गायन, वादन आणि नृत्य यांविषयी ७०० हून अधिक संशोधनात्मक प्रयोग केले असल्याचे सांगितले, तसेच या वेळी भारतीय संगीतातील सात्त्विकता दर्शवणार्या संशोधनावरील ध्वनीचित्रफिती दाखवण्यात आल्या. त्यामुळे उपस्थित शिबिरार्थींना संगीताविषयीचे नवीन पैलू शिकायला मिळाले.
क्षणचित्रे
१. डॉ. प्रवीण गावकर महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा विषय ऐकण्यासाठी स्वत: पुढे बसले होते. त्यांनी या विषयानुरूप विचारलेल्या प्रश्नांची सहजतेने उत्तरे दिली. यातून त्यांच्यातील नम्रता शिकायला मिळाली. त्यांनी सर्व विषय जिज्ञासेने जाणून घेतला, तसेच विद्याथ्र्यांचे शंकानिरसन होईपर्यंत प्रश्नोत्तराचे सत्र चालू ठेवले.
२. कार्यक्रमानंतर अनेक शिबिराथ्र्यांच्या मनात संशोधन केंद्राला भेट देण्याविषयी उत्सुकता निर्माण झाली. दोन शिबिरार्थींनी ‘तुमचे कार्य पुष्कळ चांगले आहे. तुमच्या आश्रमाला नक्की भेट देऊ’, असे सांगितले.
३. सिंधुदुर्ग येथील एका शिबिरार्थीने सांगितले, ‘‘आमच्या घराजवळ रहाणारे काही परिचयाचे लोक साधना करतात. ते आम्हाला या कार्याविषयी सतत सांगत असत; परंतु आम्ही त्यांचे म्हणणे मनावर घेत नव्हतो; परंतु आजचा विषय ऐकल्यावर ते सांगत असलेले मनापासून करावे, असे वाटायला लागले आहे.’’
४. शिबिरार्थी नुकतेच बाहेरून आल्याने थकले होते. तरी त्यांनी शेवटपर्यंत उत्साहाने विषय ऐकून घेतला.
डॉ. प्रवीण गावकर यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाविषयी काढलेले गौरवोद्गारशिबिराचे आयोजक डॉ. प्रवीण गावकर महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे साधक आणि कार्य यांविषयी कौतुक करतांना म्हणाले, ‘‘आमचे आभार मानण्यापेक्षा तुम्ही एवढा वेळ काढून या शिबिराला आला, हे महत्त्वाचे आहे. तसेच तुम्ही निःस्वार्थ भावाने एकही पैसा न घेता हे कार्य करत आहात. यासाठी मीच तुमचा आभारी आहे.’’ समारोपाचे भाषण करतांना डॉ. गावकर म्हणाले, ‘‘एवढे मोठे संशोधन कार्य करण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधकांना वेळ द्यावा लागतो. ते तन, मन आणि धन यांचा त्याग करून समर्पित भावाने पुष्कळ मोठे कार्य करत आहेत. फोंडा येथील संशोधन केंद्रात त्यांचे ईश्वरी कार्य चालू आहे. त्याला आमच्या मनापासून शुभेच्छा !’’ |
अनुभूतीशिबिरातील विषयाला प्रारंभ झाल्यावर वातावरणात हलकेपणा निर्माण झाल्याचे जाणवले. – कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आणि वय १५ वर्षे), फोंडा, गोवा. (२६.१२.२०२२) |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |